पणजी : विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर गोव्यात (Goa) आमदारांचे पक्षांतर वाढू लागले आहे. भाजपला (BJP) चोवीस तासात दोन मोठे धक्के बसले होते. कॅबिनेट मंत्र्याने बुधवारी रात्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर एका आमदारानेही पक्षाला रामराम ठोकला आहे. तर शुक्रवारी एका अपक्ष आमदाराने भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला काही दिलासा मिळाला आहे.
अपक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte) यांनी शुक्रवारी गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) उपस्थित होते. खंवटे यांनी दोन दिवसांपूर्वी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. काही महिन्यांपूर्वी खंवटे हे काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता होती. अखेर शुक्रवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.
दीड महिन्याभरापूर्वी खंवटे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना कॉंग्रेसमध्ये पाठवले होते. त्याचेवळी त्यांनी पक्षांतराचे संकेत दिले होते. पण, योग्य वागणूक मिळत नसल्याचे कारण देत कार्यकर्त्यांनी सामूहिक राजीनामे दिले होते. त्यामुळे ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत, हे स्पष्ट होते. पण त्याचवेळी त्यांची भाजपसोबतही बोलणी सुरू होती. पर्वरी मतदारसंघातील स्थानिक नेत्यांनीही खंवटे यांच्या प्रवेशाला विरोध केला होता. अखेर भाजपच्या नेतृत्वाने खंवटे यांच्या प्रवेशाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांचा आज पक्षप्रवेश झाला.
दरम्यान, गोव्याचे (Goa) नगर विकास मंत्री आणि भाजपचे (BJP) आमदार मिलिंद नाईक (Milind Naik) यांनी बुधवारी रात्री उशिरा मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सेक्स स्कँडलमध्ये (Sex Scandle) सहभागी असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने (Congress) केला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी अलीना सलडान्हा (Alina Saldanha) यांनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्या कोणत्या पक्षात प्रवेश करणार, याबाबत राजकीय चर्चांना उधाण आलं होतं. अलीना यांनी त्यांच्या पती मथानी सलडान्हा यांच्या निधनानंतर भाजपमध्ये प्रवेश केला होता. अखेर अलीना यांनी आम आदमी पक्षाला पसंती दिली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्या उपस्थितीत त्यांनी आमदारकीच्या राजीनाम्यानंतर काही तासांतच आपमध्ये प्रवेश केला.
राजीनामा देताना सलडान्हा म्हणाल्या होत्या की, भाजपमध्ये दिवंगत मथानी सलडान्हा हे आले होते. त्यांच्या निधनानंतर त्या जागेवर मी राजकारणात प्रवेश केला होता. पण आता भाजप हा पक्ष पूर्वीसारखा राहिलेला नाही. आपल्या सर्व तत्वांना पक्ष विसरला असल्यासारखे वाटते, असे सलडान्हा म्हणाल्या. सलडान्हा यांनी अद्याप भाजपला सोडचिठ्ठी दिली नसली तरी त्या याबाबत लवकरच निर्णय घेण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.