नवी दिल्ली : भारतात ओमियोक्रॉनचे रुग्ण वाढत असताना आणि संकट गडद होत असताना एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. भारतात लसीकरणास पात्र असलेल्या ५० टक्के जनतेला दोन्ही डोस मिळाले आहेत. आरोग्यमंत्री डॉ. मनसुख मांडविय यांनी ट्विटरवरुन भारताचे अभिनंदन करत याबाबतची माहिती दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार ४ डिसेंबर अखेर भारतात ४६ कोटी ९३ लाख ३४ हजार ६७२ लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तर आता पर्यंत ७९ कोटी ६० लाख १० हजार ३०३ लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे.
तिकडे हिमाचल प्रदेशनेही कोरोना लसीकरणाच्या पात्र नागरिकांना दुसऱ्या डोसचे १०० टक्के लसीकरण पुर्ण करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारे हिमाचल प्रदेश भारतातील पहिलेच राज्य ठरले आहे. हिमचाल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी ट्टिट करुन याबाबतची माहिती दिली आहे. हिमाचल प्रदेशने राज्यात तब्बल ५३ लाख ८६ हजार ३९३ पात्र लोकांना कोरोना लसीचा दुसरा डोस दिला आहे.
जयराम ठाकूर यांनी ट्वीटमध्ये जनतेचे अभिनंदन केले आहे. ठाकूर म्हणाले, "आज आपल्या हिमाचल प्रदेशने आणखी एक इतिहास रचत देशात प्रथम स्थान प्राप्त केले आहे. पात्र नागरिकांना कोरोना लसीचा दुसरा डोस देऊन हिमाचल प्रदेशने देशात प्रथम क्रमांक पटकावला आहे. राज्यातील सर्व नागरिकांचे हार्दिक अभिनंदन आणि आरोग्य विभाग/टीमचे आभार"
विषेश म्हणजे पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण पुर्ण करणारे पहिले राज्य म्हणूनही हिमाचल प्रदेशनेच बाजी मारली होती. त्यानंतर आता दुसरा डोस सगळ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर महिन्यात हिमाचल प्रदेशच्या लसीकरण अभियानाचे तोंड भरुन कौतूक केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.