Prime Minister Narendra Modi congratulated citizens after India recorded 7.8% economic growth, highlighting the country's collective strength and hard work. Sarkarnama
देश

India GDP Growth : भारताच्या GDP मध्ये 7.8 टक्के वाढ झाल्याचं सांगत PM मोदींनी सोने खरदेबाबत देशवासीयांना पुन्हा केलं मोठं आवाहन

PM Modi Reaction on GDP Growth : "कोविड काळापासून म्हणजेच 2020 पासून जगातील अनेक भागांमध्ये स्थैर्याचा अभाव राहिला आहे. असे असतानाही भारत वेगाने पुढे जात आहे. जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असताना 7.8 टक्के विकासदर गाठणे हे देशाच्या सामूहिक ताकदीचे द्योतक आहे.''

Jagdish Patil

India GDP Growth : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या 7.8 टक्के आर्थिक विकासदरासाठी (GDP) देशवासीयांचे अभिनंदन केले आहे. सोशल मीडियावरील एका पोस्टद्वारे पंतप्रधान मोदी यांनी हे यश देशाची सामूहिक ताकद, संकल्प आणि कष्टाचे परिणाम असल्याचे म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, "आज जगातील अनेक भाग संघर्ष आणि संकटांचा सामना करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहून युद्धाच्या बातम्या समोर येत आहेत आणि जागतिक स्तरावर अनेक आव्हाने कायम आहेत. त्यासोबतच पुरवठा साखळीही मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे.

कोविडच्या काळापासून म्हणजेच 2020 पासून जगातील अनेक भागांमध्ये स्थैर्याचा अभाव राहिला आहे. असे असतानाही भारत वेगाने पुढे जात आहे. जागतिक परिस्थिती आव्हानात्मक असताना 7.8 टक्के विकासदर गाठणे हे देशाच्या सामूहिक ताकदीचे द्योतक आहे."

तर याचवेळी पंतप्रधानांनी देशवासीयांच्या मेहनतीचे आणि संकल्पाचे कौतुक करताना हे यश भारताच्या क्षमतेचे प्रतिबिंब असल्याचे सांगितले. देशाने विकासाची हीच गती कायम ठेवावी आणि प्रगतीचा वेग आणखी पुढे न्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

मात्र, यासाठी आत्मनिर्भर भारताचा मंत्र सदैव स्मरणात ठेवण्याचं आणि स्वदेशी वापराचा सल्ला देखील मोदींनी दिला. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा सोने खरेदीबाबातही नागरिकांना मोठं आवाहन केलं आहे. ते म्हणाले, "आत्मनिर्भर भारतावर आपणाला जोर द्यावा लागणार आहे. स्वदेशीचा मंत्र लोकल फॉर वोकलसह परदेशी यात्रा, परदेशात लग्न केली नाही पाहिजेत. मेड इन इंडियाचा मंत्र जपला पाहिजे आणि गरज नसेल तर सोनं खरेदी केलं नाही पाहिजे, असं मोदी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी या पोस्टमधून देशात निराशावादी वातावरण निर्माण करणाऱ्यांवरही निशाणा साधला. काही लोक खोटे आणि निराशा पसरवण्याचे काम करत असल्याचे त्यांनी म्हटले. देशाला या अडथळ्यांवर मात करून सातत्याने पुढे जावे लागेल, असेही त्यांनी सांगितले. तर तमाम आव्हानांना मागे टाकत भारताने 7.8 टक्के आर्थिक विकासदर गाठला आहे. आता ही गती कायम ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT