India China military tensions : अरुणाचल प्रदेशमध्ये भारत आणि चीन सीमेवर तणावाची स्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारत-तिबेट सीमा पोलीस दलाचे महासंचालक शत्रुजीत कपूर यांनीच याबाबत सर्वात मोठा खुलासा केला आहे. अरूणाचल प्रदेश सीमेवर अनेकदा भारत आणि चीन सैनिकांमध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली होती. ते अजूनही सुरूच असल्याचा दावा कपूर यांनी केला आहे.
ITBP चे महासंचालक कपूर यांनी एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये अनेकदा अशी स्थिती निर्माण झाली होती. तिथे आमची शौर्य कमांडो टीम आहे. त्यांनी खूप चांगले काम केले आहे. ही एक नवी टीम असल्याचे कपूर यांनी स्पष्ट केले. कपूर यांच्या या एका दाव्याने देशाचे राजकारण तापले आहे.
काँग्रेसने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढविला आहे. काँग्रेसने सोशल मीडियात केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जुलै महिन्यापासूनच चीनी सैनिकांसोबत तणावाची स्थिती असल्याची माहिती समोर येत होती. पण मोदी सरकार ही माहिती दाबून टाकत होती. चीनकडे डोळे वटारून बघण्याऐवजी नरेंद्र मोदी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यासोबत ब्रिक्स परिषदेत हसताना दिसून आले.
एकीकडे चीन आपल्या सैनिकांसोबत झटापट करत असताना दुसरीकडे मोदी चीनच्या राष्ट्रपतींचे स्वागत करत होते. हे आपल्या सैनिकांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. मोदींनी नेहमीच आपल्या सैनिकांना एकटे सोडले आहे. देशासोबत गद्दारी केली आहे. जबाबदारी झटकली आहे. कधी चीनला क्लीन चिट देतात, तर कधी देशाची जमीन देतात. या कमकुवत पंतप्रधानांनी देशाचे मोठे नुकसान केले आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.
ITBP चे काम काय?
इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलीस (आयटीबीपी) दलाची स्थापना २४ ऑक्टोबर १९६२ रोजी झाली आहे. आयटीबीपी लडाखमधील काराकोरम खिंडीपासून ते अरुणाचल प्रदेशातील जाचेप ला पर्यंत पसरलेल्या ३ हजार ४८८ किलोमीटर लांबीच्या भारत-चीन सीमेचे रक्षण करते. याव्यतिरिक्त, छत्तीसगडसह अन्य काही राज्यांत अंतर्गत सुरक्षा आणि डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी कारवायांविरुद्धच्या मोहिमांमध्येही या दलाची महत्त्वाची भूमिका आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.