AI Scam: आर्टिफिशिअल इंटिलिजन्स अर्थात AIच्या वापरानं आता सर्वच क्षेत्रे व्यापून घेतली आहेत. त्याच्या वापरानं आता वेगही धारण केला आहे, पण त्यामुळं अनेक नवे प्रश्न निर्माण होत आहेत. कारण भारतातला AI चा पहिला घोटाळा समोर आला आहे, तो एका सरकारी ग्रंथालयात. याप्रकरणी सत्तेत राहिलेल्या राजकीय पक्षावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तामिळनाडूच्या एका सरकारी ग्रंथालयासाठी खऱेदी करण्यात आलेल्या पुस्तकांवरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ए. राजमोहन यांनी आरोप केलाकी, मागच्या डीएमके सरकारच्या कार्यकाळात कृत्रीम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या मदतीनं तयार करण्यात आलेली बनावट पुस्तक सरकारी ग्रंथालयांसाठी खऱेदी करण्यात आली. त्यांनी याला भारताचा पहिला AI घोटाळा असंही संबोधलं आहे. मंत्र्यांनी याप्रकरणी भ्रष्टाचारविरोधी पोलिसांकडं हे प्रकरणी तक्रार केली आहे. तसंच या संपूर्ण प्रकरणाच्या तपासणीसाठी एक विशेष समिती देखील नेमली आहे.
हा वाद तेव्हा समोर जेव्हा तमिळ कादंबरीकार परुमल मुरुगन यांनी कोईंमतूरचे पेरियार अरिवुलगम ग्रंथालयात ठेवण्यात आलेली काही महागड्या पुस्तकांच्या गुणवत्तेवर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी आपल्या एका लेखामध्ये लिहिलं की, या पुस्तकांमध्ये मुळ स्वरुपात बऱ्याच चुका आहेत. इतिहासाशी संबंधित गोंधळात टाकणारे दावे करण्यात आले आहेत, तसंच यामध्ये अशा लेखकांची नावं आहेत ज्यांच्याबाबत माहिती मिळवणं अशक्य आहे. हा लेख प्रसिद्ध झाल्यानंतर तमिळनाडू सरकारनं याप्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.
शालेय शिक्षण, तमिळ विकास, सूचना आणि जनसंपर्क मंत्री ए. राजमोहन यांनी शनिवारी ही पुस्तक दाखवताना आरोप केला की, हे प्रकरण काईमतूरच्या एका ग्रंथालयापर्यंत मर्यादित नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, अगलविलक्कु पब्लिशिंग हाऊसच्यावतीनं प्रकाशित अशी पुस्तकं चेन्नईच्या कॉनेमारा ग्रंथालय आणि मदुराईच्या कलैग्नार ग्रंथालयासह अनेक अन्य सरकारी ग्रंथालयांमध्ये देखील पोहोचली आहेत.
मंत्री राजमोहन यांनी आरोप केला की, वेगवेगळ्या लेखकांच्या पुस्तकांना एआयच्या मदतीनं नवी पुस्तकं तयार केली गेली. त्यांनी या घोटाळ्याची तुलना बनावट नोटा छापण्याशी केली. याला भारताचा पहिला एआय घोटाळा असं म्हटलं गेलं. यासाठी मंत्र्यांनी काही ठोस पुरावे दिले नाहीत पण एआयच्या मदतीनं ती तयार केली गेली हे निश्चितच आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.