India Surpasses Japan to Become 4th Largest Economy Sarkarnama
देश

India 4th Largest Economy: इतिहास रचला! जपानला टाकलं मागे, भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था

India Surpasses Japan to Become 4th Largest Economy: भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारताने जपानला मागे टाकले आहे असे त्यांनी सांगितले आहे.इंटरनेशनल मॉनेटरी फंड (IMF)च्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे.

Mangesh Mahale

India Becomes Fourth Largest Economy: जपानला मागे टाकत भारत जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम यांनी ही माहिती दिली आहे.

इंटरनेशनल मॉनेटरी फंड (IMF)च्या आकडेवारीचा दाखला देत त्यांनी ही गुड न्यूज दिली आहे. भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारताने जपानला मागे टाकले आहे, असे त्यांनी सांगितले आहे.

IMFच्या आकडेवारीवरुन भारत लवकरच तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या जर्मनीला मागे टाकणार असल्याचे दिसते. इंटरनेशनल मॉनेटरी फंडने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरुन भारत हा पाचव्या क्रमांकावरुन चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मात देत ही किमया साधली आहे.

नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर, नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर भाष्य केले. ते म्हणाले, "आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे आणि ही माझी आकडेवारी नाही. हा आयएमएफचा डेटा आहे. आज भारत जपानपेक्षा मोठा आहे. फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी आपल्यापेक्षा मोठे आहेत. जर आपण जे विचारात घेतले जात आहे त्यावर टिकून राहिलो तर पुढील अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू."

"भारत अशा टप्प्यावर आहे जिथे तो खूप वेगाने विकास करू शकतो, जसे की भूतकाळात अनेक देशांनी केले आहे. पुढील 20 ते 25 वर्षांसाठी भारताला लोकसंख्याशास्त्रीय लाभांश मिळाला आहे, ज्यामुळे आपल्याला वेगाने विकास करता येईल," असे सुब्रह्मण्यम म्हणाले.

संयुक्त राष्ट्रांच्या (UN) एका अहवालानुसार,

  • सध्या भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे.

  • या वर्षी भारतीय अर्थव्यवस्था केवळ चीनलाच नव्हे तर अमेरिका आणि युरोपलाही मागे टाकेल. यामुळे अर्थव्यवस्थेच्या बाबतीत भारत पहिल्या स्थानावर असेल.

  • अहवालानुसार, भारताची अर्थव्यवस्था या वर्षी ६.३% दराने वाढेल. जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये हे सर्वाधिक आहे.

  • चीनची अर्थव्यवस्था ४.६%, अमेरिकेची १.६%, जपानची ०.७% आणि युरोपची १% दराने वाढण्याचा अंदाज आहे. जर्मनीची अर्थव्यवस्था ०.१% ने घसरू शकते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT