India-Pakistan Tension: जम्मू-कश्मीर मधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवून पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादांचे 9 तळ उद्धवस्त केले आहेत. त्यानंतर भारत-पाकमधील तणाव वाढला आहे. दोन दिवसापासून पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारत प्रत्युत्तर देत आहे. भारतीय लष्करी तळावर हवाई हल्ला करणाऱ्याचा प्रयत्न करणारा पाकिस्तानला भारताने करारा जवाब दिला आहे.
भारत-पाक तणावानंतर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंस आणि चीनने मोठे विधान केले आहे. 'भारत-पाकच्या सुरु असलेल्या युद्धात अमेरिका सहभागी होणार नाही, ते आमचे काम नाही,'असे जे.डी. व्हान्स यांनी म्हटलं आहे.
दोन्ही देशातील युद्धजन्य परिस्थितीवर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी म्हटलं आहे की अमेरिका भारत आणि पाकिस्तानाला नियंत्रित करु शकत नाही. पण दोन्ही देशांना अणुशक्तीचा वापर न करण्याचा सल्ला दिला आहे. गुरुवारी एका कार्यक्रमात ते बोलत होते. भारत-पाक तणावावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. दोन्ही देशांनी परमाणु शक्ती वापर करु नये, कारण यामुळे मोठा संघर्ष सुरु होऊ शकतो, असे त्यांनी म्हटलं आहे.
भारताला पाकिस्तानबाबत अनेक तक्रारी आहेत. पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. आम्ही दोन्ही देशातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण आम्ही युद्धात पडणार नाही.
भारत-पाकिस्तानच्या सध्याच्या परिस्थितीवर नजर ठेवून असलेल्या चीनने एक मोठे विधान केले आहे. दोन्ही देशातील सध्य परिस्थितीबाबत आम्हाला चिंता आहे. दोन्ही देशांनी शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावे, असे चीनने म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.