India Maldives Relations : मालदीवच्या महिला मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टीका केली होती. या प्रकरणाची भारताने गंभीर दखल घेतली. भारताने मालदीवच्या मोहम्मद मुइज्जू सरकारसमोर हा मुद्दा उपस्थित केला. भारतीय उच्चायुक्तांनी मालदीव सरकारकडे कडक शब्दांत आक्षेप नोंदवला. यावर मालदीव सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. मंत्र्यांचे ते व्यक्तिगत मत आहे. मंत्र्याने घेतलेली भूमिका ही मालदीव सरकारची नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
पंतप्रधान Narendra Modi नी लक्षद्वीप दौऱ्यात ट्विटरवर फोटो शेअर केले होते. पर्यटनासाठी भारतीयांनी लक्षद्वीपला यावे, असे आवाहन केले होते. यावर मालदीवच्या मंत्री मरियम शिउना यांनी पंतप्रधान मोदींच्या पोस्टवर आक्षेपार्ह टीका केली होती. भारतीय इंटरनेट युजर्सनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर शिउना यांनी आपले ट्विट डिलिट केले होते.
मालदीव सरकारने काय म्हटले?
मालदीव सरकारने या संपूर्ण प्रकरणावर एक निवेदन जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विदेशातील नेते आणि उच्चपदावरील व्यक्तींविरोधात सोशल मीडियावरून होत असलेल्या आक्षेपार्ह टीकेबाबत मालदीव सरकार जाणून आहे. पण ही त्यांची वैयक्तीक भूमिका आहे. हे मालदीव सरकारचे विचार नाहीत, असे त्यांनी म्हटले आहे.
अशा टीकांवर कारवाई होणार
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग हा लोकशाही मार्गाने आणि जबाबदारीने केला पाहिजे. त्या माध्यमातून आपली भूमिका मांडली ( India Politics News ) पाहिजे. यातून द्वेष किंवा नकारात्मका पसरली जावू नये. अशा आक्षेपार्ह टीका करणाऱ्यांवर अधिकाऱ्यांनी कारवाई करावी, असे मालदीव सरकारने म्हटले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावरून वाद
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्याची मालदीवच्या एका मंत्र्यासह अनेक राजकीय नेत्यांनी खिल्ली उडवली. मंत्री मरियम शिउना यांनी ट्विटरवरून टीका केली. यानंतर वाद सुरू झाला. पंतप्रधान मोदी 'बाहुले' आहे, असे मालदीवचे नेते म्हणाले. जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी आपली पोस्ट डिलिट केली. मालदीव नॅशनल पार्टीनेही सरकारच्या मंत्र्यांनी केलेल्या वक्तव्यावर टीका केली आहे.
edited by sachin fulpagare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.