Dr. Manmohan Singh Sarkarnama
देश

Manmohan Singh In Parliament : नव्वदीतही मनमोहन सिंगांचा मोदींविरोधातला आवाज बुलंद ! 'व्हीलचेअर'वरचा फोटो व्हायरल..

INDIA Vs NDA : आजारपण बाजूला सारून मनमोहन सिंग सरसावले 'इंडिया'च्या मदतीला

सरकारनामा ब्यूरो

Delhi News : फोडाफोडी, दगाबाजीच्या राजकारणात कोण कोणाच्या गळाला लागेल ? याचा नेम उरला. एखाद्या सरकारविरोधातल्या अविश्‍वास प्रस्तावाला काहीजण दांडी मारून राजकीय ‘सेटलमेंट’ करीत असल्याचे ऐकिवात आहेत. पण वयाच्या नव्वदीतील माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी चक्क ‘व्हीलचेअर’वरून संसदेत आले आणि मोदी सरकारविरोधात उतरून काँग्रेसनिष्ठा दाखवली. साऱ्याच पक्षांनी ‘व्हीप’ बजावूनही काहीजण लोकसभा, राज्यसभेत फिरकले नाहीत; मात्र, आजारपणातही शरीर थकले तरीही, मोदीविरोधात आपला आवाज आजही बुलंद असल्याचेच मनमोहन सिंगांनी दाखवून दिले. (Latest Political News)

आपले शिक्षण आणि अनुभवाच्या जोरावर भारताच्या विकासासाठी आयुष्यभर प्रयत्न करणारे मनमोहन सिंग यांनी वयाच्या नव्वदीतही आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडली. दिल्ली सेवा विधेयकावर चर्चा आणि मतदान करण्यासाठी प्रकृती अस्वस्थ असतानाही मनमोहन सिंग यांनी 'व्हीलचेअर'वर येत विधेयकावर मतदान केले. यापूर्वीही ते अनेकदा संकटात असणाऱ्या काँग्रसच्या मदतीला धावून गेले आहेत. आताही आजारपणापेक्षाही त्यांनी संसद आणि काँग्रेससाठी असलेली निष्ठा दाखवून दिली आहे.

दिल्ली सेवा विधेयकाच्या माध्यमातून केंद्र सरकार दिल्ली सरकारच्या अधिकारात ढवळाढवळ करून लोकशाहीला धक्का देत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. या विधेयकाविरोधात मतदान करण्यासाठी आपले आजारपण बाजूला सारून पक्षाची निकड ओळखून मनमोहन सिंग राज्यसभेत चर्चा आणि मतदानासाठी उपस्थित होते. त्यांचा 'व्हीलचेअर'वरील फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे वयाच्या नव्वदीत आहेत. गेल्या काही दिवासांपासून त्यांची प्रकृती ठीक नाही. मात्र राज्यसभेत दिल्ली विधेयक मंजूर होऊ नये म्हणून विरोधातील 'इंडिया'तील प्रत्येक खासदाराचे मत महत्वाचे होते. आपल्या पक्षाची आणि विधेयकावर होणारी चर्चा आणि मतदानाचे महत्व ओळखून मनमोहन सिंग यांनी संसदेत उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. ते 'व्हीलचेअर' बसून संसदेत आले आणि मतदानही केले. दरम्यान, लोकसभेननंतर राज्यसभेतही दिल्ली सेवा विधेयक १३१ विरुद्ध १०२ मतांनी मंजूर झाले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT