Indian stock market 25 year record : भारतीय शेअर बाजारात मंदीची लाट अधिकच तीव्र झाली असून गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होत आहे.
परकीय गुंतवणूकदारांनी (FIIs) चालवलेला विक्रीचा धडाका, खनिज तेलाच्या भडकलेल्या किमती आणि अमेरिकन रोख्यांवरील वाढलेला परतावा यामुळे बाजारात सातत्याने पडझड सुरू आहे. या घसरणीने आता तब्बल 25 वर्षांनंतरचा ऐतिहासिक विक्रम मोडीत काढला आहे.
सुमारे 25 वर्षांपूर्वी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील ‘डॉट-कॉम बबल’ फुटल्यानंतर बाजारात (Investor) सलग सात आठवडे घसरण झाली होती. यंदाच्या मंदीने हा विक्रमही मोडीत काढत सलग आठव्या आठवड्यातही पडझड नोंदवली आहे.
आठवड्याच्या शेवटी सेन्सेक्स 750.59 अंकांनी गडगडत 72,421.15 च्या पातळीवर बंद झाला. सेन्सेक्समधील (Share Market) तब्बल 30 प्रमुख कंपन्यांपैकी प्रमुख समभागांमध्ये मोठी विक्री दिसून आली. भारती एअरटेल, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा स्टील, अदानी पोर्ट्स, आयटीसी, पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर अन् इन्फोसिस या मोठ्या शेअर्सला सर्वाधिक फटका बसला.
सुट्ट्यांमुळे चार दिवसांच्याच ठरलेल्या या आठवड्यात निफ्टी तब्बल 3.9 टक्क्यांनी घसरला. गेल्या आठ आठवड्यांचा विचार केल्यास निफ्टीमध्ये एकूण 8.7 टक्क्यांची मोठी तूट निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे सेन्सेक्समध्ये या आठवड्यात 2.7 टक्क्यांची साप्ताहिक घसरण झाली असून, आठ आठवड्यांतील एकूण नुकसान 8.4 टक्क्यांवर पोहोचले आहे.
बाजारात पडझड होण्यामागे तीन मोठी कारणे आहेत. परकीय गुंतवणूकदारांची माघार हे प्रमुख कारण असून भारतीय बाजारातून परदेशी निधी मोठ्या प्रमाणावर बाहेर काढला जात आहे. तसेच खनिज तेलाचे दर शंभर डॉलरच्या वर टिकून आहेत. जागतिक तणावामुळे क्रूड ऑइलच्या किमती वाढल्याने भारतीय अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. याशिवाय अमेरिकन रोख्यांवरील परतावा वाढला आहे. अमेरिकेत व्याजदर उच्च राहण्याच्या भीतीने गुंतवणूकदार सुरक्षित परताव्याकडे वळत आहेत.
सलग आठ आठवड्यांच्या या घसरणीमुळे "शेअर बाजारातील ही पडझड थांबणार कधी?" असा गंभीर प्रश्न सर्वसामान्य गुंतवणूकदारांसमोर उभा राहिला आहे. बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत परकीय गुंतवणूकदारांची विक्री थांबत नाही, तोपर्यंत बाजारात अशीच अस्थिरता राहू शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.