PM Modi Remembered Bad Times Emergency
PM Modi Remembered Bad Times Emergency Sarkarnama
देश

50th Anniversary Of Emergency:भाजपनं काँग्रेसला करुन दिली मनोज कुमार यांच्या 'शोर'ची आठवण

Mangesh Mahale

संविधानाला पायदळी तुडवित 25 जून 1975 रोजी देशात इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लावली. या घटनेच्या कटू आठवणी स्मरणात ठेवून भाजपकडून आज ‘आणीबाणी एक काळा दिवस’ हे प्रबोधनात्मक अभियान महाराष्ट्रात राबविण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आणीबाणी विषयावरुन काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदींनी एक्सवर सलग चार पोस्ट शेअर करीत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे. अश्विनी वैष्णव यांनी टि्वट करीत काँग्रेसला मनोज कुमार यांच्या 'शोर'चित्रपटाची आठवण करुन दिली आहे.

आणीबाणीला (emergency) विरोध करणाऱ्या महान स्त्री-पुरुषांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आजचा दिवस आहे, असे मोदींनी म्हटलं आहे. इंदिरा गांधी यांच्या एका निर्णयामुळे हजारो नागरिकांना त्यांचे प्राण गमवावे लागले, आजच्या दिवशी 1975 मध्ये देशात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती. त्याला आज 50 वर्ष पू्र्ण होत आहेत, मोदींनी या दिवसाला इतिहासातील काळा दिवस असे म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्या टिका करताना मोदींनी चार टि्वट केले आहे.

काँग्रेसला त्यांच्या ध्येयधोरणाची आठवण मोदींनी करुन दिली आहे, लोकशाहीचा खून करीत काँग्रेसने आणीबाणीमध्ये देशाला कारागृह बनवले होते. काँग्रेसच्या निर्णयाला सर्वात मोठा फटका गरीब जनतेला बसला.ज्या लोकांनी देशात आणीबाणी लागू केली त्यांचे संविधानाबाबत प्रेम हे ढोंग आहे. आणीबाणी लागू केल्याने स्वातंत्र्यांच्या मुलभूत अधिकार हिरावून घेत काँग्रेसने संविधानाचा अपमान केला होता. ज्या संविधानाचा भारतीयांना खूप आदर सन्मान आहे, त्याला नष्ट करण्याचा काँग्रेसने प्रयत्न केला होता, असे मोदींनी म्हटलं आहे.

1972 मध्ये प्रदर्शित झालेला 'शोर' चित्रपटाची आठवण भाजपने काँग्रेसला करुन दिली आहे. ज्येष्ठ अभिनेता मनोज कुमार यांचा या चित्रपटातील गाणी खूप लोकप्रिय ठरली होती. त्या काळी सुपरहीट ठरलेल्या या चित्रपटाचे लेखक, डायरेक्टर आणि प्रोड्यूसर हे मनोज कुमार होते. हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची योजना होती. पण त्यापूर्वी मनोज कुमार यांनी आणिबाणीला विरोध करीत संजय गांधी आणि तत्कालीन माहिती प्रसारण मंत्री विद्याचरण शुक्ल यांच्याकडून नाराजी ओढवून घेतली होती. चित्रपट प्रदर्शित झाला पण बहुसंख्य जणांनी त्याकडे पाठ फिरवली होती. याबाबतचे टि्वट अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT