IPS officer's 95-year-old mother murdered Sarkarnama
देश

IPS Officer Mother: IPS अधिकाऱ्याच्या 95 वर्षीय आईची घरात घुसून हत्या; तोंडात बोळा, सोन्याचे दागिनेही लुटले

95-year-old mother of IPS officer murdered: उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगरमध्ये IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या 95 वर्षीय आईची घरात घुसून हत्या; सोन्याचे दागिनेही लंपास.

Mangesh Mahale

IPS officer mother killed in house: भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधिकाऱ्याच्या 95 वर्षीय आईची घरात घुसून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपींनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही लंपास केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनासह परिसरात खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर जिल्ह्यात ही घटना घडली

मृत महिलेचे नाव इंद्रावती असून त्या 2016 च्या बॅचचे IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांच्या आई होत्या. त्या रुधा धामरुवा गावातील आपल्या घरी एकट्याच राहत होत्या. आशुतोष मिश्रा हे एका शालेय कार्यक्रमासाठी बाहेर गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर ते संध्याकाळी लखनऊला परतले. मात्र, त्यानंतरच्या दिवशी, 16 ऑगस्ट रोजी सकाळी ही भयावह घटना उघडकीस आली.

दररोजप्रमाणे घरकाम करणारी महिला सकाळी सुमारे 9 वाजता इंद्रावती यांच्या घरी पोहोचली. घरात प्रवेश केल्यानंतर तिला इंद्रावती यांचा मृतदेह खाटेवर पडलेल्या अवस्थेत दिसला. त्यांच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबण्यात आला होता, तर चेहऱ्यावर रक्ताचे डागही आढळून आले. त्यानंतर या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

घरातून सोन्याची साखळी, नथ, कानातील दागिने आणि पैंजण गायब असल्याचे तपासात समोर आले आहे. शनिवारी रात्री घरात घुसलेल्या चोरट्यांनी दागिने लुटण्यापूर्वी इंद्रावती यांची हत्या केली असावी, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे.

आंबेडकरनगरच्या पोलीस अधीक्षक प्राची सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 13 मिनिटांनी रमेश चंद्र मिश्रा नावाच्या व्यक्तीने पोलीस ठाण्यात फोन करून इंद्रावती यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

मात्र, त्यानंतर दुपारी सुमारे 2 वाजून 30 मिनिटांनी IPS अधिकारी आशुतोष मिश्रा यांनी स्वतः पोलिसांशी संपर्क साधला. त्यांनी आईचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगत हत्या झाल्याची शक्यता व्यक्त केली. तसेच आईच्या अंगावरील सोन्याचे दागिनेही गायब असल्याची माहिती पोलिसांना दिली.

घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक पथकासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. प्राथमिक तपासात मृतदेहावर कोणत्याही ठळक जखमा किंवा घरात झटापट झाल्याच्या खुणा आढळल्या नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून तीन डॉक्टरांच्या पथकाकडून व्हिडिओग्राफीच्या माध्यमातून शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर इंद्रावती यांच्या मृत्यूचे नेमके कारण आणि घटनेमागील परिस्थिती अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT