Actress Ranya Rao News Sarkarnama
देश

Ranya Rao Arrest : IPS अधिकाऱ्याच्या अभिनेत्री कन्येला अटक; बंगळुरू विमानतळावर 14 किलो सोने, 2 कोटींची रोकड जप्त

Ranya Rao Gold Smuggling 14 Kg Gold Seized Bangalore:रान्या ही गेल्या पंधरा दिवसांत चार वेळा दुबईला गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांची तिच्यावर पहिल्यापासून नजर होती. यावेळी ती दुबईवारी करुन आली तेव्हा तिनं खूप सारे सोन्याचे दागिने परिधान केले होते.

Mangesh Mahale

Actress Ranya Rao News, IPS Story: डीजीपी दर्जाच्या आयपीएस (IPS) अधिकाऱ्याच्या अभिनेत्री असलेल्या कन्येला विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्यावर सोन्याची तस्करी करण्याचा आरोप आहे. तिच्याकडून 14 किलो सोनं जप्त करण्यात आले आहे. त्याचे बाजारमूल्य 12.56 कोटी रुपये आहे. तिच्यावर निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात पोलिसांना 2.67 कोटी रुपयांची रोकड आढळली आहे.

रान्या राव असे अटक करण्यात आलेल्या अभिनेत्रीचं नाव आहे. कर्नाटक केडरचे आयपीए अधिकारी रामचंद्र राव यांची ती मुलगी आहे. रामचंद्र राव डीजीपी दर्जाचे (DGP)चे अधिकारी आहेत.

पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे ते संचालक आहेत.रान्या राव ही कन्नड चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आहे. तिला बैंगलुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन अटक करण्यात आली आहे. तिच्याकडून 14 किलो 8 ग्रॅम सोने जप्त केल्याची माहिती बैंगलुरु येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रान्या ही दुबईवरुन येत असताना तिच्यावर ही कारवाई करण्यात आली.

रान्या ही गेल्या पंधरा दिवसांत चार वेळा दुबईला गेली असल्याची माहिती समोर आली आहे. तपास यंत्रणांची तिच्यावर पहिल्यापासून नजर होती. यावेळी ती दुबईवारी करुन आली तेव्हा तिनं खूप सारे सोन्याचे दागिने परिधान केले होते. तिच्यावर संशय आल्यानं पोलिसांनी तिची तपासणी केली असता तिच्याकडे बेकायदा सोने आढळले. तिनं हे सोने आपल्या कपड्यामध्ये लपवलं होते.

रान्या राव हिला न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयानं तिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणानंतर तिचे वडील रामचंद्र राव यांनी आपला हा प्रकरणाशी काहीही संबध नाही, असे सांगितले. रान्या आणि तिच्या परिवाराबाबत आपल्याला माहित नसल्याचे रामचंद्र राव यांनी माध्यमांना सांगितले. तिच्या हा कृतीमुळे आम्हाला खंत आहे. चौकशी करुन तिच्यावर योग्य ती कारवाई होईल.

2014 मध्ये प्रसिध्द झालेल्या माणिक्य या चित्रपटात कन्नड सुपरस्टार सुदीप याच्यासोबत तिनं काम केले होते. त्यानंतर ती चर्चत आली होती. अनेक दक्षिणात्य चित्रपटात तिनं केलेल्या भूमिकांचे सिनेरसिकांनी कौतुक केले आहे.

रान्या ही रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी आहे.अभियांत्रिकी शाखेची पदवीधर असलेल्या रान्याला महाविद्यालयीन जीवनापासून चित्रपटसृष्टीची आवड होती. चार महिन्यापूर्वी तिचं लग्न झाले असून कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यात ती आपल्या पतीसह राहते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT