Iran Fires on Indian Tankers Audio Clip Viral : होर्मुज सामुद्रधुनी जवळ शनिवारी (ता.१८) घडलेल्या एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. ती म्हणजे इराणने भारताच्या दोन तेलवाहू जहाजांवर गोळीबार केला, मात्र सुदैवाने कोणत्याही भारतीय कर्मचाऱ्याला दुखापत झाली नाही. मात्र, गोळीबारानंतर या जहाजांना आपला मार्ग बदलून परत फिरावे लागले.
अशातच आता या प्रकरणाशी संबंधित एक ३० सेकंदांची ऑडिओ क्लिप समोर आली आहे, ज्यामुळे घटनाक्रम अधिकच गंभीर वाटू लागला आहे. ही क्लिप ‘सनमार हेराल्ड’ या कच्चे तेल वाहून नेणाऱ्या जहाजावरील असल्याचे सांगितले जात आहे. ही क्लिप समुद्री गुप्त माहिती देणारी संस्था टँकर ट्रैकर्स यांनी प्रसिद्ध केली आहे.
या ऑडिओमध्ये जहाजावरील एक कर्मचारी इराणी नौदलशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करताना ऐकू येतो. तो स्पष्टपणे सांगतो: "सिपह नेवी, सिपह नेवी, मी मोटर टँकर सनमार हेराल्डवरून बोलत आहे. तुम्हीच आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती. तुमच्या यादीत माझे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण आता तुम्ही आमच्यावर गोळीबार करत आहात. कृपया आम्हाला परत जाण्याची परवानगी द्या."
अहवालानुसार, गोळीबार झाला त्या वेळी जहाज सुरक्षित क्षेत्रात होते. काही वेळासाठी जहाजाने आपली ओळख लपवण्यासाठी स्वयंचलित ओळख प्रणाली बंद केली होती, मात्र नंतर ती पुन्हा सुरू करण्यात आली. 'सनमार हेराल्ड'सह 'जग अर्नव' या आणखी एका भारतीय जहाजावरही गोळीबार झाल्याची माहिती आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी होर्मुज मार्ग भारतीय जहाजांसाठी खुला राहील असे सांगितले होते. त्यांनी भारत-इराण संबंध चांगले असल्याचेही नमूद केले होते. मात्र या घटनेनंतर त्यांच्या वक्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
तर संपूर्ण प्रकरणावर अद्याप इराणकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, त्यामुळे आता यावर भारत सरकार नेमकी काय भूमिका घेणार आणि इराण काय स्पष्टीकरण देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.