India gas supply risk news : अमेरिका आणि इस्त्रायलकडून सुरू असलेल्या हल्ले थांबत नसून इराणकडूनही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले जात आहे. त्यामुळे युध्द अधिकच चिघळले असून त्याचा थेट परिणाम आखाती देशांसह जगभरातील अनेक देशांवर होऊ लागले आहेत. इराणने गुरूवारी कतारमधील सर्वात मोठ्या एलएनजी प्रकल्पावर हल्ला करत जगाची काळजी वाढविली आहे.
कतारकडून शुक्रवारी पुढील पाच वर्षांसाठी एलएनजी पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो, अशी माहिती देत हादरा दिला आहे. यामध्ये भारतासह अन्य काही देशांचा समावेश आहे. मागील काही दिवसांपासून भारतामध्ये गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. प्रामुख्याने व्यावसायिक गॅसचा वापर कमी व्हावा आणि घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सरकारकडून उपाययोजना केल्या जात आहे. तसेच अधिकाधिक ग्राहकांनी पीएनजीचा वापर करावा, असेही आवाहन केले जात आहे.
एलपीजीचा पुरवठा सुरळीत असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जात आहे. मात्र, आज कतारने धोक्याचा इशारा देत भारतासह अनेक देशांची झोप उडविली आहे. कतार एनर्जीचे सीईओ आणि मंत्री साद अल काबी यांनी सांगितले की, इराणच्या हल्ल्यात एलएनजी निर्यात क्षमतेचे सुमारे १७ टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे तब्बल २० अब्ज डॉलरचे वार्षिक महसुलाचे नुकसान होणार आहे.
प्रकल्पाच्या दुरूस्तीच्या कामासाठी पुढील ३ ते ५ वर्षांपर्यंत दरवर्षी १२.८ मिलियन टन एलएनजीचे उत्पादन बाधित होईल. त्याचा परिणाम भारतासह चीन आणि आशियातील अन्य काही देशांच्या पुरवठ्यावर होईल. मागील काही दिवसांत इराणने केलेल्या हल्ल्यात प्रकल्पासह वाहतुकीच्या सुविधांनाही फटका बसला आहे, असे अल काबी यांनी सांगितले.
कतार एनर्जी ही सरकारी मालकीची कंपनी आहे. इराणच्या हल्ल्यामुळे कतारला १० ते २० वर्षे मागे नेले आहे. राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण असलेल्या प्रतिमेला निश्चितपणे तडा गेला आहे, अशी भीतीही अल काबी यांनी व्यक्त केली. एलएनजी प्रकल्पातील उपकरणांच्या दुरूस्तीसाठी तब्बल एक वर्षांपर्यंतचा कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.