Iran Vs Israel : इस्त्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याचे प्रत्युत्तर इराणने दिले आहे. इराणने इस्रायलवर मोठा हल्ला केला आहे. शुक्रवारी रात्री उशिरा शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे इस्त्राइलवर डागली. इराणने या प्रत्युत्तरात्मक कारवाईला 'ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 3' असे नाव दिले आहे.
या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या हल्ल्याविषयी इराणच्या लष्कराकडून निवेदन देण्यात आले आहे. त्यामुळे म्हटले आहे की, इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराणमधील काही भागांवर अत्याचारी, दहशतवादी व लहानमुलांची हत्या करणाऱ्या इस्त्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आहे.
इस्त्रायल आणि इराण यांच्यातील तणाव वाढला असून दोन्ही देशांनी एकमेकांच्या लष्करी तळांवर क्षेपणास्त्र डागली. इस्त्रायलच्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी इराणने तेहरानमधील मोनिरिएह परिसरात एअर डिफेन्स सिस्टिम वेगाने सक्रिय झाली असल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले. विशेष म्हणजे इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनेई यांचे निवासस्थान आणि राष्ट्रपती कार्यालय तेहरानमधील मोनिरिए परिसरातच आहे.
इराणचे लष्करी अधिकारी मेजर जनरल अहमद वाहिदी यांनी इस्त्रायलवरील या हल्ल्याची माहिती देताना सांगितले की, इराणने इस्त्रायलच्या महत्त्वाच्या लष्करी तळांना टार्गेट केले. त्यात नेवातिम एअरबेस, F-35, F-16 आणि F-15 लढाऊ विमाने, जड इंधन वाहक टँकर, कमांड आणि कंट्रोल सेंटर, इलेक्ट्रॉनिक युद्ध केंद्र, संरक्षण मंत्रालय आणि लष्करी उद्योगाशी संबंधित केंद्रांचा समावेश होता. दरम्यान, 'न्यूयॉर्क टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, शुक्रवारी रात्री इराणच्या मिसाइल हल्ल्यात तेल अवीवजवळील रमात गन भागात एका महिलेला मृत्यू झाला आहे.
इस्त्रायले इराणवर हल्ला केला होता. इस्त्रायलने सांगितले होते की अणुक्षेपणास्त्र तयार करण्याच्या तयारीत इराण होता त्यामुळे अण्वीक प्रोजेक्ट असलेल्या भागांना टार्गेट करण्यात आले. यामध्ये इराण वरिष्ठ अणुशास्त्रज्ञ तसेच इराणच्या लष्कर प्रमुखाचा मृत्यू झाला. दरम्यान, संयुक्त राष्ट्रातील इराणचे राजदूत आमिर सईद इरावानी यांनी सांगितले की, इस्त्रायलच्या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 78 जणांचा मृत्यू झाला असून 320 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. त्यांनी बहुसंख्य मृतांमध्ये सामान्य नागरिक, महिला आणि लहान मुले होती. ईराणी राजदूतांनी या हल्ल्यांना क्रूर आणि गुन्हेगारी स्वरूपाचे म्हणून निषेध केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.