Hormuz Strait Tensions : संपूर्ण जगाला दिलासा देणाऱ्या इराण आणि अमेरिकेतील शांतता करार भंग होणार की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चांना कारणीभूत ठरला लेबनॉन आणि इस्रायलमधील संघर्ष.
दक्षिण लेबनॉनमध्ये इस्रायलकडून होणारे सततचे हल्ले आणि आणि शांतता करारातील अटींचे सातत्याने उल्लंघन होत असल्याचा आरोप करत इराणच्या संयुक्त लष्करी कमांडने पुन्हा एकदा होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली आहे.
त्यामुळे आता पुन्हा एकदा या दोन्ही देशांतील शांतता करारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. इराणच्या या निर्णयाचा जागतिक इंधनपुरवठ्यावर पुन्हा विपरीत परिणाम दाट शक्यता असून पुन्हा एकदा संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे.
तर होर्मुझची सामुद्रधुनीची नाकेबंदी करताना, इराणने वॉशिंग्टनने केलेला स्पष्ट विश्वासघात आणि करारातील पहिल्या कलमाची अंमलबजावणी करण्यात आलेले अपयश कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. शिवाय लेबनॉनमधील युद्धबंदीचे इस्रायलने उल्लंघन केल्यामुळे सामुद्रधुनी बंद केल्याचंही इराणने स्पष्ट केलं आहे.
तर ही बंदी असून पहिले पाऊल यापुढेही आक्रमण सुरूच राहिल्यास वेगळी पावले उचलली जातील, असा इशारा देखील दिला आहे. अमेरिका-इराणमधील शांतता करारानंतर या आठवड्याच्या सुरुवातीलाच हा होर्मुझची सामुद्रधुनीची खुली करण्यात आली होती.
त्यामुळे संपूर्ण जगाला दिलासा मिळाला होता. अशातच आता इस्रायलने लेबनॉनमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने इराण आता आणखी आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर इराणने सामुद्रधुनी पुन्हा बंद करण्याची घोषणा केली असून आयआरजीसीने जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीजवळ न जाण्याचा इशारा दिल्याचं इराणी माध्यमांनी म्हटलं आहे.
एकीकडे इराणने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचं म्हटलं आहे. मात्र, दुसरीकडे अमेरिकी सैन्यदलाने होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याचा दावा फेटाळला आहे. महत्त्वपूर्ण जलवाहिनी खुली असल्याचे आणि ती तशीच खुली राहावी यासाठी अमेरिकन दल परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचं अमेरिकी लष्कराने स्पष्ट केलं आहे.
शिवाय होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणचे नियंत्रण नाही, असंही अमेरिकी नौदलाने म्हटलं आहे. त्यामुळे होर्मुझच्या नाकेबंदीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. तर दक्षिण लेबनॉनमध्ये शनिवारी इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये दोन मुलांसह किमान १६ जण ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.