Iran US Strike  Sarkarnama
देश

US Strike : मोठी बातमी : भारताकडे उड्डाण करण्याआधीच अमेरिकेकडून इराणी विमानावर एअरस्ट्राईक

Iran US Strike | Mahan Air Plane Hit | Mashhad Airport : भारताने यापूर्वीही इराण वैद्यकीय सहाय्य पुरविले आहे. त्याबद्दल इराणने भारताचे जाहीर आभार मानले होते. तसेच होर्मूझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या मालवाहतूक जहाजांनाही इराणने परवानगी दिली होती.

Rajanand More

Iran war update : अमेरिका आणि इस्त्रायलकडून इराणवर सुरू असलेले हल्ले कमी होताना दिसत नाहीत. प्रामुख्याने इराणमधील लष्करी तळांना लक्ष्य केले जात असून या हल्ल्यात इराणचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, आज अमेरिकेकडून इराणमधून दिल्लीकडे उड्डाण करण्यासाठी सज्ज होत असलेल्या विमानावर एअरस्ट्राईक केल्याचे समोर आले आहे.

इराणमधील महान एअरलाईन्स या खासगी विमान कंपनीच्या विमानावर अमेरिकेने हल्ला केला आहे. हे विमान १ एप्रिलला दिल्लीत उतरणार होते. भारताकडून इराणला वैद्यकीय तसेच आपत्कालीन स्थितीत आवश्यक मदत पाठविली जात आहे. ही मदत नेण्यासाठी हे विमान दिल्लीत येणार होते. मात्र, त्याआधीच अमेरिकेने त्यावर हल्ला केला.

अमेरिकेने आज इराणमधील मशहद आंतरराष्ट्रीय विमानतळावर हल्ला केला. याच विमानतळावर भारताकडे येणारे विमानही होते. या हल्ल्यात विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने विमानवरील हल्ल्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. उपलब्ध माहितीनुसार, दिल्लीतून विमानाने तब्बल ११ टनांहून अधिक वैद्यकीय साहित्य इराणला पाठविले जाणार होते.

दरम्यान, भारताने यापूर्वीही इराण वैद्यकीय सहाय्य पुरविले आहे. त्याबद्दल इराणने भारताचे जाहीर आभार मानले होते. तसेच होर्मूझ सामुद्रधुनीतून भारताकडे येणाऱ्या मालवाहतूक जहाजांनाही इराणने परवानगी दिली होती. युध्दजन्य स्थितीतही दोन्ही देशांमधील मैत्रीचे संबंध अधिक दृढ असल्याचे दिसून आले होते.

अमेरिकेच्या आजच्या हल्ल्यात भारताकडे येणाऱ्या विमानाचे नुकसान झाल्याने इराणला पाठविण्यात येणाऱ्या मदतीलाही आता काही प्रमाणात फटका बसणार आहे. इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू असल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून केला जात आहे. मात्र, त्यानंतरही इराणवर हल्ले होत असल्याने हे युध्द आणखी चिघळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

आता अमेरिकेच्या हल्ल्यात खासगी कंपनीच्या विमानांचेही मोठे नुकसान झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. इराणला होणारी सर्वप्रकारची मदत तोडण्यासाठी अमेरिकेकडून प्रयत्न केले जात आहेत. इराणवर ताबा मिळविण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. इराणला चोहोबाजूने घेरण्याचा प्लॅन अमेरिकेने केल्याचे सांगितले जात आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT