Narendra Modi, Benjamin Netanyahu  Sarkarnama
देश

Ratan Tata : रतन टाटांच्या निधनाने इस्त्रायलचे पंतप्रधानही भावूक; मोदींना पाठवला खास संदेश

Benjamin Netanyahu Narendra Modi India Israel Friendship : रतन टाटा यांच्या निधनानंतर जगभरातील नेत्यांकडून दु:ख व्यक्त केले जात आहे.

Rajanand More

New Delhi : उद्योग जगतातील दिग्गज रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण भारत देश हळहळला. एवढेच नव्हे तर जगभरातील अनेक देशांमध्येही टाटांच्या निधनानंतर दु:ख व्यक्त करण्यात आले. इस्त्रायलच्या पंतप्रधान बेंझामिन नेतान्याहू यांनाही टाटांच्या निधनाचे वृत्त समजल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना संदेश पाठवला आहे.

नेतान्याहू यांनी रतन टाटा यांचा उल्लेख चॅम्पियन असा केला आहे. भारत आणि इस्त्रायलच्या मैत्रीतील चॅम्पियन अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. नेतान्याहू यांनी पंतप्रधान मोदींना संबोधित करणारी एक पोस्ट ‘एक्स’वर शेअर केली आहे. 

भारत आणि इस्त्रायलमधील मैत्रीच्या संबंधांवर प्रकाश टाकत नेतान्याहू यांनी त्यामध्ये असलेल्या टाटांच्या महत्वाच्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला आहे. त्यासाठी त्यांनी टाटांचा उल्लेख चॅम्पियन असा केला आहे. त्यांनी शनिवारी रात्री ही पोस्ट केली आहे.

काय म्हटले आहे पोस्टमध्ये?

नेतान्याहू यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मी आणि इस्त्रायलचे असंख्य लोक भारताचे महान सुपुत्र आणि दोन्ही देशांमधील मैत्रीचे चॅम्पियन रतन नवल टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करतो. रतन टाटा यांच्य कुटुंबियांपर्यंत माझ्य संवेदना पोहचवाव्यात, असे नेतान्याहू यांनी मोदींना म्हटले आहे.

फ्रान्स, सिंगापूरच्या पंतप्रधानांकडूनही श्रध्दांजली

सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेंस वोंग यांनीही टाटांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले. आपल्या देशाचे सच्चे मित्र, असे वोंग यांनी म्हटले होते. तर फ्रान्सचे राष्ट्रपती इम्युनुल मेक्रॉन यांनीही टाटांविषयी आपल्या भावना व्यक्त केला होत्या. नाविन्यतेसोबतच उत्पादनातील टाटांच्या योगदानाचे कौतुक त्यांनी केले होते. भारत आणि फ्रान्समधील उद्योगांना मजबूत करण्यासाठी टाटांची मोठी भूमिका असल्याचेही मॅक्रॉन यांनी म्हटले होते.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT