Jagan Mohan Reddy
Jagan Mohan Reddy Sarkarnama
देश

Jagan Mohan Reddy News: निवडणुकीत दारुण पराभव, माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींना आणखी एक धक्का; थेट बुलडोझर कारवाई...

Deepak Kulkarni

Jagan Mohan Reddy: आंध्र प्रदेशमधील विधानसभा निवडणुका नुक्त्यात पार पडल्या. या निवडणुकीत एन.चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) जगनमोहन रेड्डी यांच्या 'वायएसआरपी' पक्षाचा धुव्वा उडवला. तेलगू देसम पार्टी 135 जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला तर पवन कल्याण यांच्या जनसेना पक्षाला 21 तर भाजपला 8 जागा मिळाल्या आहेत.

एनडीएच्या या दणदणीत यशानंतर चंद्राबाबू नायडू यांनी मुख्यमंत्री तर पवन कल्याण यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर काही दिवसांतच आता आंध्र प्रदेशचे माजी सीएम राहिलेल्या जगनमोहन रेड्डी (Jagan Mohan Reddy) यांना मोठा धक्का बसला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि वायएसआरसीपी अध्यक्ष जगनमोहन रेड्डी यांचे अनधिकृत बांधकाम ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेने कारवाई केली आहे. रेड्डी यांच्या लोटस पॉण्ड येथील निवासस्थानासमोर त्यांच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर अतिक्रमण करून ते बांधण्यात आलेल्या बांधकाम पाडण्यात आले आहे.

या अतिक्रमण आणि रस्त्याच्या बांधकामाविरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या.त्या तक्रारींची गंभीर दखल घेत ही कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.

नुकत्याच पार पडलेल्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत जगन मोहन रेड्डी यांना दारुण पराभव स्विकारावा लागला. पराभवानंतर सुरक्षा नव्हती. त्यामुळे पोलिसांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी त्यांचे अवैध बांधकाम पाडले. 2019 आंध्र प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी एकूण 175 विधानसभा विभागांपैकी 151 जागा जिंकून पक्षाला राज्याच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून दिला होता.

पण 2024 च्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला तीव्र सत्ताविरोधी आणि पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मधील 151 वरून केवळ 11 जागांवर घसरण झाली. या पराभवाचा धक्क्यातून सावरत नाही, तोच आता जगनमोहन रेड्डी यांना आंध्र प्रदेशमधील चंद्राबाबू नायडू (N. Chandrababu Naidu) सरकार सत्तेत येताच आणखी एक झटका बसला आहे.

जगनमोहन रेड्डी यांच्या समर्थकांनी या कारवाईवर भाष्य केले. ते म्हणाले, रेड्डी यांच्या सुरक्षेचा विचार करून रस्त्याच्याकडेला ही खोली बांधण्यात आली होती. पण ग्रेटर हैदराबाद महापालिकेने आता पोलिसांच्या उपस्थितीत अधिकाऱ्यांनी रेड्डी यांच्या निवासस्थानाबाहेर असलेले अवैध बांधकामावर बुलडोझर चालवत कारवाई केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT