CISF Security 
देश

Kathua Firing: काश्मीरमध्ये अंदाधुंद गोळीबार! एका अधिकाऱ्यासह CISFच्या चार जवानांचा मृत्यू

Kathua Firing: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये CISFच्या अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या चार जवानांचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू झाला आहे.

Amit Ujagare

Kathua Firing: जम्मू-काश्मीरच्या कठुआमध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. यामध्ये CISFच्या अर्थात केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या चार जवानांचा अंदाधुंद गोळीबारात मृत्यू झाला आहे. CISFच्या कॅम्पमध्येच हा प्रकार घडला. मृतांमध्ये एक अधिकारी आणि तीन जवानांचा सामावेश आहे. या घटनेमुळं एकच खळबळ उडाली आहे. CISF च्या अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यातील बसोली येथील CISFच्या कॅम्पमध्ये काही जवानांचं एकमेकांशी जोरदार भांडण झालं. यानंतर एका जवानानं आपल्या सर्विस रायफलमधून अंदाधुंद फायरिंग केली. मंगळवारी संध्याकाळी ७.१० वाजण्याच्या सुमारामास ही घटना घडली. हिमाचल प्रदेशच्या सीमाभागातील बसोहली येथील मशका गावातील सेवा-२ हायड्रो पॉवर प्रोजेक्टवर तैनात असताना ही घटना घडली. या प्रकल्पाला CISFच्या जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे. यासाठी तैनात असलेल्या जवानांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे.

वादाची पार्श्वभूमी असली तरी नेमका वाद कशामुळं झाला हे अद्याप कळू शकलेलं नाही. पण यामध्ये एका अधिकाऱ्यासह चार जवानांचा मृत्यू झाला आहे. या फायरिंगनंतर सुरुवातीला हे जवान गंभीर जखमी झाले होते त्यामुळं त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्यानं उपचारांदरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT