Grenade attack in Srinagar Sarkarnama
देश

Grenade Attack in Srinagar : श्रीनगरमधील संडे मार्केट हादरले; लष्कराच्या वाहनांवर ग्रेनेड हल्ला  

Jammu and Kashmir Terrorism : मागील काही महिन्यांत जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहेत.

Rajanand More

New Delhi : जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगर रविवारी ग्रेनेड हल्ल्याने हादरले. संडे मार्केट परिसरात दुपारी दहशतवाद्यांकडून ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात किमान 15 नागरिक जखमी झाले आहेत. हा हल्ला टूरिस्ट रिसेप्शन सेंटरजवळ झाला आहे.

टीआरसीजवळील सुरक्षा दलाच्या वाहनांवर ग्रेनेड फेकण्यात आले होते. पण हे ग्रेनेड रस्त्यावर पडले आणि मोठा स्फोट झाला. या हल्ल्यानंतर लष्कराने संपूर्ण परिसरात शोधमोहिम हाती घेतली आहे. राज्यात शनिवारीच लष्कर आणि दहशतवाद्यांमुळे चकमक उडाली होती. त्यामध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. श्रीनगर आणि अनंतनागमध्ये ही चकमक उडाली होती.

दरम्यान, मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्यानंतर चिंता व्यक्त केली आहे. ‘एक्स’वर पोस्ट करत त्यांनी म्हटले आहे की, श्रीनगरमधील संडे मार्केटमधील निर्दोष दुकानदारांवर करण्यात आलेल्या ग्रेनेड हल्ल्याची बातमी विचलित करणारी आहे. निर्दोष नागरिकांना लक्ष्य केले जात असेल तर त्याचे कुणीही समर्थन करणार नाही. सुरक्षा यंत्रणांवर अशाप्रकारे हल्ले रोखण्यासठी तातडीने पावले उचलावीत, जेणेकरून नागरिक निर्भयपणे आपले आयुष्य जगू शकतील, असे अब्दुल्लांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT