Indian Counter Terror Operation: जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याशी संबंधित असलेले दोन स्थानिक दहशतवादी आदिल थोकर आणि आसिफ शेख यांची घर भारतीय सुरक्षा दलाने गुरुवारी रात्री उद्ध्वस्त केली आहेत. अनंतनाग आणि अवंतीपोरा येथील या दहशतवाद्यांच्या घरावर ही कारवाई करण्यात आली आहे.
यापैकी आदिल थोकरने नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यातील पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक आणि लॉजिस्टिक्स समन्वयक म्हणून काम केल्याचा आरोप गुप्तचर यंत्रणांनी केला आहे.
त्यामुळे त्याचे घर सुरक्षा दलांनी बॉम्बने उडवल्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. तर भारत आता दहशतवाद खपवून घेणार नाही, त्यांना जशास तसं उत्तर देणार असल्याच्या भूमिकेत असल्याचं पाहायला मिळत आहे.
घरात घुसून मारू, असं म्हणत आता भारतीय सुरक्षा दलांनी कारवाई करायला सुरूवात केल्याचं दिसतं आहे. पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी हल्ला केला. यामध्ये 28 पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर देशभरातून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
अशातच काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधून कल्पनाही केली नसेल अशी शिक्षा दहशतवाद्यांना देऊ आणि त्यांचे उरले सुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्धवस्त करण्याची ही वेळ असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या इशाऱ्यानंतर भारतीय सेनेकडून जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार सर्च ऑपरेशन सुरू आहे.
अशातच आता पहलगाम येथे हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आदिल थोकर आणि आसिफ शेख यांच्या घरावर सुरक्षा दलाने मोठी कारवाई करत त्यांची घरं उद्ध्वस्त केली आहेत. यापैकी आदिलचं घरं बॉम्बने उडवलं आहे. तर आसिफच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे.
आदिल हा 2018 मध्ये अटारी-वाघा सीमेवरून कायदेशीररित्या पाकिस्तानात गेला होता. तर मागील वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये येण्यापूर्वी त्याने दहशतवादी प्रशिक्षण घेतल्याचा आरोप त्याच्यावर आहे. गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांच्या मते, त्याने नुकत्याच पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात सहभागी असलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांसाठी मार्गदर्शक आणि समन्वयक म्हणून काम केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.