Karnataka Election 2023 JDS Manifesto
Karnataka Election 2023 JDS Manifesto  Sarkarnama
देश

JDS Manifesto For Karnataka Election : गर्भवतींना JDS देणार सहा हजार रुपये मानधन, अंगणवाडी सेविकांच्या वेतनात वाढ..

सरकारनामा ब्यूरो

JDS Manifesto For Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत कॉग्रेस, भाजप,आणि जेडीएस यांच्यात लढत होत आहे. तीनही पक्षानी कर्नाटकची सत्ता काबीज करण्यासाठी कंबर कसली आहे.

जेडीएसने २०१८ मध्ये काँग्रेसच्या सत्ता स्थापनेत किंग मेकरची भूमिका बजावली होती. यंदाच्या निवडणुकीत जेडीएस किंग मेकरची भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे.

जेडीएसचे काल (गुरुवारी) आपले घोषणापत्र (Manifesto) जाहीर केले आहे. माजी मुख्यमंत्री, विधीमंडळातील जेडीएसचे नेते एचडी कुमारस्वामी यांनी बैंगलुरु येथे पक्षाचे नऊ सुत्री घोषणापत्र जाहीर केले.

जेडीएसचे नेते विधानपरिषदेतील आमदार बीएम फारुक यांच्या नेतृत्वाखालील एका समितीने हे घोषणापत्र तयार केले आहे. यात समाजातील विविध वर्गासाठी विविध योजनाचा समावेश आहे.

माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या नेतृत्वाखाली जेडीएसचे प्रमुख कुमारस्वामी यांनी महिलांसाठी एक विशेष योजनेची घोषणा केली आहे.

गर्भवती महिलांसाठी सहा महिन्यापर्यंत दरमहा सहा हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील महिला बचत गटाचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन जेडीएसने मतदारांना दिले आहे.

याशिवाय जेडीएसने राज्यातील विधवा महिलांना देण्यात येणाऱ्या पेंशनमध्ये वाढ करणात आहे. सध्या ९०० रुपये पेंशन विधवांना दिली जाते, यात वाढ करुन ती अडीच हजार रुपये करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.

अंगणवाडी सेविकांच्या वेतनामध्ये पाच हजार रुपयांचे वाढ करण्यात येणार असल्याचे आश्वासन जेडीएसने दिले आहे. कर्नाटकमध्ये १० मे रोजी मतदान होत आहे. १३ मे रोजी निकाल आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT