Jharkhand CM Hemant Soren Sarkarnama
देश

Hemant Soren : हेमंत सोरेन यांची विरोधकांवर मात; जामीन, मुख्यमंत्रिपद अन् आता...

Rajanand More

Ranchi : कथित भूखंड घोटाळाप्रकरणी नुकतेच जेलमधून बाहेर आलेल्या हेमंत सोरेन यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर मात केली आहे. काही दिवसांपूर्वीच जेलमधून जामीनावर बाहेर आलेल्या सोरेन यांनी सुरूवातीला मुख्यमंत्रिपद मिळवले. त्यानंतर सोमवारी विधानसभेत बहुमतही सिध्द करत पुन्हा एकदा आपणच ‘किंग’ असल्याचे दाखवून दिले आहे.   

विधानसभेच्या विशेष अधिवेशनामध्ये सोमवारी सकाळी हेमंत सोरेन यांनी विश्वासदर्शक ठराव मांडला होता. त्यांच्या बाजूने 45 आमदारांनी मतदान केले. बहुमत सिध्द करण्यासाठी 39 आमदारांची गरज होती. सोरेन यांनी हा ठराव जिंकत विरोधकांना चांगलीच चपराक लगावली आहे.

झारखंडच्या विधानसभेत एकूण 82 सदस्य असतात. त्यामध्ये इंडिया आघाडीमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाचे 27, काँग्रेसचे 17, राजद व माले या पक्षांचा प्रत्येकी एक आमदार होते. त्यापैकी जेएमएमच्या सीता सोरेन यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. तर दोन आमदार लोकसभेत गेले आहेत. तर दोन आमदारांनी बंडखोरी केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

राज्यात एनडीएमध्ये भाजपचे 24, आजसूचे 3, एनसीपी 1 तर अपक्ष दोन आमदार होते. त्यापैकी भाजपचे दोन आमदार लोकसभेत गेले आहेत. तर आणखी एका आमदाराने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे सध्या विद्यमान अध्यक्षांसह विधानसभेत 77 सदस्य आहेत. त्यामुळे बहुमताचा आकडा 39 होता. पण सोरेन यांच्याबाजूने 45 आमदार उभे राहिले.

दरम्यान, ईडीने अटक करण्यापुर्वी हेमंत सोरेन यांनी जानेवारी महिन्यात पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे चंपई सोरेन यांच्या खांद्यावर ही जबाबदारी आली होती. सोरेन यांना जामीन मिळाल्यानंतर ते पुन्हा मुख्यमंत्री बनले आहेत. आता त्यांच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झाली असून पत्नी कल्पना यांनाही मंत्रिमंडळात संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT