Champai Soren Sarkarnama
देश

Champai Soren : शिबू सोरेन यांच्या पक्षाला पडणार भगदाड; भाजपने लावली फिल्डिंग...

Hemant Soren JMM Jharkhand Politics : माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्यासह सहा आमदार भाजपमध्ये प्रवेश करू शकतात, अशी चर्चा आहे.

Rajanand More

New Delhi : झारखंडचे माजी मुख्यमंत्री व शिबू सोरेन यांच्या झारखंड मुक्ती मोर्चाचे ज्येष्ठ नेते चंपई सोरेन पक्षाला भगदाड पाडण्याच्या तयारीत आहेत. सहा आमदारांसह ते दिल्लीला रवाना झाले असून केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सातत्याने संपर्क असल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन तुरुंगात बाहेर आल्यानंतर चंपई सोरेन यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तेव्हापासून ते नाराज होते. आता त्यांना पक्षातील इतर काही आमदारांचीही साथ मिळाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंपई सोरेन यांनी भाजपचा रस्ता धरल्यास हेमंत सोरेन आणि इंडिया आघाडीसाठी हा मोठा धक्का असेल.

चंपई सोरेन यांच्यासोबत असलेल्या आमदारांशी पक्षाचा संपर्क होत नसल्याचे समजते. हे सर्वजण भाजपमध्ये प्रवेश करू शकतात. दशरथ गगराई, रामदास सोरेन, चमरा लिंडा, लोबिन हेमब्रोम, समीर मोहंती यांची नावे सध्या चर्चेत आहेत.

रविवारी सकाळी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी चंपई सोरेन हे रात्री कोलकातामध्ये मुक्कामी होते. तिथे त्यांनी भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. दिल्लीत ते चौहान यांच्यासह भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊ शकतात. त्यानंतर त्यांचा भाजपमधील प्रवेशाचा मुहूर्त ठरले, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

दोन दिवसांपूर्वी चंपई सोरेन यांना माध्यमांशी बोलताना भाजपमध्ये जाण्याबाबत थेट उत्तर देण्याचे टाळले होते. ते म्हणाले होते की, ‘तुम्ही लोक असा प्रश्न करत आहात, त्यावर काय बोलणार. मी तर तुमच्या समोर आहे.’ एवढेच बोलून सोरेन निघून गेले होते.

सोरेन यांच्या भाजप प्रवेशावर बोलताना पक्षाचे जी अध्यक्ष दीपक प्रकाश म्हणाले, चंपई सोरेन एक मोठे व्यक्तिमत्व आहे. झारखंडमधील साडे तीन कोटी जनता त्यांच्या कामाव खूष होती. पण त्यांना ज्याप्रकारे पदावरून हटवण्यात आले, ते दुर्दैवी होते. त्यांची काय चूक होती?

झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा चंपई सोरन यांनी जुलै महिन्यात राजीनामा दिला होता. त्यानंतर हेमंत सोरेन यांना पुन्हा या पदाची शपथ घेतली. चंपई सोरेन हे 2 फेब्रुवारी ते 3 जुलै या कालावधीत मुख्यमंत्री होते. ते राज्याचे सातवे मुख्यमंत्री होते. झारखंड मुक्ती मोर्चातील वरिष्ठ नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशावरून चर्चांना उधाण आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT