JMM and Congress Sarkarnama
देश

JMM and Congress News : झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी JMM-काँग्रेससह 'I.N.D.I.A' आघाडीचं जागा वाटप ठरलं!

Jharkhand Assembly Election 2024 : झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल.

Mayur Ratnaparkhe

INDIA Alliance News: झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीत जागा वाटप ठरलं आहे. प्राप्त माहितीनुसार झारखंड मुक्ती मोर्चा (JMM) आणि काँग्रेसच्या वाट्याला 70 जागा आल्या आहेत. तर राष्ट्रीय जनता दल आणि अन्य पक्षांसाठी उर्वरीत 11 जागा सोडण्यात आल्या आहेत.

मुख्यमंत्री हेमंत सोरेन(Hemant Soren) यांनी रांची येथील आपल्या सरकारी निवास्थानी एका पत्रकारपरिषदेत आघाडीबाबत घोषणा केली. सोरेन म्हणाले की, काँग्रेस आणि झारखंड मुक्ती मोर्चा 70 जागांवर निवडणूक लढवणार आहे. उर्वरीत जागांवर अन्य सहकारी पक्षांचे उमेदवार दिले जाणार आहेत. त्यांनी सांगितले की, यंदा आरजेडी शिवाय सीपीआय-एमएल देखील आघाडीत सहभागी आहे. झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस किती जागांवर निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप मुख्यमंत्री सोरेन यांनी खुलासा केलेला नाही.

दुसरीकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीने(NDA) शुक्रवारी आपल्या सहकाऱ्यांमध्ये जागा वाटपांच्या सूत्राची घोषणा केली आहे. यानुसार भाजप 68 जागांवर ‘ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियन' (आजसू) 10, जनता दल (यूनाइटेड) दोन आणि लोक जनशक्ति पार्टी (रामविलास) एका जागेवर निवडणूक लढवणार आहे.

झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीआधी तीनवेळा भाजपचे(BJP) आमदार राहिलेले केदार हाजरा आणि ऑल झारखंड स्टूडेंट्स यूनियनचे नेते उमाकांत रजक यांनी शुक्रवारी झारखंड मुक्ती मोर्चामध्ये प्रवेश केला आहे.

झारखंडमध्ये विधानसभेच्या 81 जागांसाठी दोन टप्प्यात मतदान 13 आणि 20 नोव्हेंबर रोजी होईल. तर मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी होईल. निवडणूक आयोगानुसार झारखंडमध्ये 2.60 कोटी मतदार आहेत. ज्यामध्ये 1.31 कोटी पुरुष आणि 1.29 कोटी महिला आहेत. तर झारखंड विधानसभा निवडणुकीत जवळपास 11.84 लाख मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT