Justice Arun Mishra Praises Narendra Modi
Justice Arun Mishra Praises Narendra Modi 
देश

मोदी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे नेते: न्यायाधीश मिश्रा

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दुरदृष्टी बाळगणारे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले नेते असून त्यांची वैचारिक शक्ती जागतिक तोडीची आहे,  असे असतानाही ते स्थानिक हिताकडे दुर्लक्ष करत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायधीश अरुण मिश्रा यांनी पंतप्रधानांचे कौतुक केले. 

कालबाहय झालेले दीड हजाराहून अधिक कायदे संपविल्याबद्धल मोदी आणि कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचे कौतुक करत भारत हा आंतरराष्ट्रीय समुदायाचा जबाबदार आणि पूरक सदस्य असल्याचे मिश्रा म्हणाले. सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठता क्रमाने तिसऱ्या स्थानावर असणारे न्यायाधीश मिश्रा यांनी मोंदी यांचे आंतरराष्ट्रीय न्यायपरिषदेचे उदघाटन केल्याबद्धल आभार मानले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT