justinTrudeau, Narendra Modi Sarkarnama
देश

India Vs Canada : कॅनडाच्या संरक्षण मंत्र्याला उपरती; म्हणाले, 'आमच्यासाठी भारत महत्त्वाचाच...'

America And India : आय फाइव्हच्या गुप्त माहितीच्या अधारे भारतावर आरोप...

Sunil Balasaheb Dhumal

Delhi NEws : कॅनडात जूनमध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग याच्या हत्येनंतर भारत आणि कॅनडाचे संबंध ताणले आहेत. हरदीपच्या हत्येमागे भारत असल्याचा आरोप कॅनडाने केला. यावर भारतानेही पुरावे द्या, हवेत बोलू नका, असे त्यांना खडसावले. यानंतर दोन्ही देशांतील अधिकारी आणि नागरिकांना उभय देशांनी सतर्क राहण्याचे आदेश दिले. परिणामी या देशांतील वाद चिघळत चालल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत कॅनडाच्या संरक्षणमंत्र्यांना उपरती आली आहे. उभय देशांचे संबंध महत्त्वाचे असल्याचे सांगत त्यांनी वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. (Latest Political News)

खलिस्तानी दहशतवाद्यांवरून भारत-कॅनडा संबंधांमध्ये तणाव आहे. यातच कॅनडाचे संरक्षणमंत्री बिल ब्लेअर यांनी आपल्या देशाचे भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे. तेथील एका वृत्तपत्रकाला ब्लेअरने सांगितले, "भारतासोबतचे कॅनडाच्या संबंधात तेढ निर्माण झाला असून, ती एक समस्या बनेल. ती टाळण्यासाठी आम्ही हरदीपप्रकरणी सखोल चौकशी करू शकतो. या हत्येमागील घटनाक्रमांची खात्री करायला हवी. यातूनच सत्य बाहेर येणार आहे. तसेच उभय देशांतील संबंध सुधारण्यास मदत होणार असल्याचे आम्हाला समजले आहे."

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारत-कॅनडातील संबंधावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर ब्लेअर यांनी आपले मत व्यक्त केले. दरम्यान, अमिरिकेचे ब्लिंकन म्हणाले होते की, कॅनडाने भारतावर केलेल्या आरोपांवर अमेरिका सखोल विचार करत आहे. यावर तपासाअंती सत्य बाहेर येईल. यानंतर ब्लेअर यांनी भारताच्या संबंधाबाबत मवाळ भूमिका घेतल्याने त्यांचे विधान महत्त्वपूर्ण ठरत आहे. (Maharashtra Political News)

दरम्यान, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या भारतावर मोठ्या आरोपामागे आय फाइव्ह संघटनेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीचा आधार असल्याचे बोलले जात होते. तसेच हरदीपच्या हत्येमागे भारत असल्याची माहिती अमेरिकेनेच कॅनडाला दिल्याची कबुली खुद्द अमेरिकेच्या एका उच्च राजनैतिक अधिकाऱ्याने दिली आहे. यानंतरच कॅनडाच्या पंतप्रधानांनी निज्जर हत्याकांडात भारतीय एजन्सीचा सहभाग असल्याचा आक्षेपार्ह आरोप केला होता. या संघटनेत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या पाच देशांचा समावेश आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT