Kamal Hassan sarkarnama
देश

Kamal Haasan : कन्नड भाषा वाद सुरू असतानाच, कमल हसन यांचा राज्यसभा उमेदवारीबाबत मोठा निर्णय!

Kamal Hassan Decision regarding Rajya Sabha : तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने त्यांच्या कोट्यातील चार राज्यसभेच्या जागांपैकी एक जागा कमल हसन यांच्या पक्ष मक्कल निधी मय्यमला देण्याचा निर्णय घेतला आहे.

Mayur Ratnaparkhe

Kamal Haasan and the Kannada language controversy :दाक्षिणात्य चित्रपटांमधील सुपरस्टार कमल हसन यांने आज एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आपल्या निर्णयास स्थगिती दिली आहे. याधी असे वृत्त समोर आले होते की कमल हसन आज राज्यसभेसाठी आज अर्ज दाखल करणार आहेत. परंतु त्यांना हा निर्णय स्थगित केलं.

तामिळनाडूतील सत्ताधारी द्रमुकने त्यांच्या कोट्यातील चार राज्यसभेच्या जागांपैकी एक जागा कमल हसन यांच्या पक्ष मक्कल निधी मय्यमला देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे या जागेद्वारे कमल हसन पहिल्यांदाच राज्यसभेत पोहचणार आहेत.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एमके स्टॅलिन यांनी सांगितले आहे की, कमल हसन यांचा पक्ष एमएनएमला एक जागा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी दोन्ही पक्षांमध्ये एख करार झाला होता. द्रमुखने राज्यसभेसाठी उर्वरीत तीन उमेदवारांची नावं जाहीर केलेली आहेत. पक्षाने पी विल्सन, सलमा आणि एसआर शिवलिंगम यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

यावर्षी २४ जुलै रोजी तामिळनाडूतूल सहा राज्यसभेचे सदस्य निवृत्त होत आहेत. यामध्ये पीएमकेचे अंबुमणी रामदास, एमडीएमके नेते वैको यांचा समावेश आहे. राज्यसभेसाठी ९ जूनपर्यंत नामांकन दाखल करता येईल. तर दुसऱ्या दिवशी छाणणी होईल आणि १९ जून रोजी मतदान होईल आणि त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे.

कमल हसन सध्य कन्नड भाषेबाबत त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कन्नड भाषेचा जन्म तामिळ भाषेतून झाला, असं कमल हसन म्हणाले होते. शिवाय, त्यांन या टिप्पणीबद्दल माफी मागण्यास नकार दिल्यानंतर कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांना मंगळवारी फटकारले देखील आहे. तर त्यांचा आगामी ठग लाईफ हा चित्रपट यामुळे वादात अडकला असून आता तो कर्नाटकात प्रदर्शित होणार नसल्याचे समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT