Kamal Nath Meet High Command : Sarkarnama
देश

Kamal Nath Meet High Command : दारुण पराभवानंतर कमलनाथ हायकमांडच्या दरबारी; राजीनाम्यासाठी दबाव?

Kamal Nath Meet Congress National High Command : राहुल गांधींसह ज्येष्ठ नेत्यांच्या सभा होऊ दिल्या नाहीत का?

Chetan Zadpe

Delhi News : मध्य प्रदेशात काँग्रेसच्या दारुण पराभवामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्यावर आता राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालल्याची चर्चा आहे. कमलनाथ आज मंगळवारी (दि.5 डिसेंबर) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेणार आहेत. काँग्रेसच्या दारूण पराभवानंतर ते पदाचा राजीनामा देतील, अशी दाट शक्यता आहे.

विधानसभेच्या 230 जागा असलेल्या मध्य प्रदेशात भाजपने 163 जागा जिंकून तब्बल दोन तृतीयांश बहुमत मिळवले. तर काँग्रेसला केवळ 66 जागा मिळाल्या. काँग्रेसमधून अशा अपमानजनक पराभवामुळे असंतोष आहे. (Latest Marathi News)

मागील 2018 च्या विधानसभा निवडणुकीत 114 जागा जिंकून कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली मध्य प्रदेशात सरकार स्थापन करणार्‍या काँग्रेसने 2023 च्या विधानसभा निवडणुकीत अत्यंत निराशाजनक कामगिरी केली. कमलनाथ यांना पक्षाने पूर्ण स्वातंत्र्य दिले असून, त्याचा परिणाम म्हणजे हा दारूण पराभव आहे, असाही सूर उमटत आहे. राज्यात काँग्रेसचे सरकार असताना भाजपने आमदार फोडून सत्ता आणली होती. काँग्रेस सरकार पाडत पुन्हा शिवराज सिंह मुख्यमंत्री बनले. काँग्रेसचं सरकार पडण्यासाठीही कमलनाथ यांनाच जबाबदार मानले जात होते.

कमलनाथ यांनी 2018 प्रमाणेच 2023 च्या विधानसभा निवडणुका घेतल्या. काँग्रेस हायकमांडचा हस्तक्षेपही त्यांना नको होता. राहुल गांधींसह अनेक काँग्रेस नेत्यांच्या जास्त सभाही त्यांनी मध्यप्रदेशात होऊ दिल्या नाहीत. सर्व तिकिटे त्यांनी स्वतःच ठरवली. निवडणूक प्रचारादरम्यान कमलनाथ यांनी काँग्रेस हायकमांडचे प्रभारी, नेते यांच्या सूचनांकडे लक्ष दिले नाही. 2018 च्या तुलनेत या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी वाईट झाली, असे राजकीय विश्लेषक सांगतात. याचेच पर्यावसान आता कमलनाथ यांच्या राजीनाम्यात उमटताना दिसण्याची शक्यता आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT