Kamal Nath On Rahul Gandhi Sarkarnama
देश

Kamal Nath On Rahul Gandhi : भाजप प्रवेशाच्या चर्चेतल्या कमलनाथ यांचे राहुल गांधींच्या नावाने जनतेला आवाहन; म्हणाले...

Kamal Nath Congress News : देशात होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात राहुल गांधी रस्त्यावर उतरले...

Chetan Zadpe

Madhya Pradesh Political News : मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेचे बडे नेते कमलनाथ हे भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता मागील काही दिवसांपासून व्यक्त केली जात होती. मात्र, आता या चर्चेदरम्यान कमलनाथ यांनी मध्य प्रदेशातील जनतेला एक आवाहन केले आहे. कमलनाथ यांनी त्यांच्या एक्स हँडलवर (X) एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील न्याय यात्रेच्या अनुषंगाने जनतेला आवाहन केले आहे. (Kamal Nath On Rahul Gandhi)

कमलनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचे स्वागत करण्यासाठी मध्य प्रदेशातील लोक आणि राज्यातील काँग्रेस कार्यकर्ते उत्साहित आहेत. राज्यातील जनतेने आणि कार्यकर्त्यांनी या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे मी आवाहन करतो."

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राहुल गांधींना पाठिंबा देण्याचे आवाहन -

कमलनाथ यांनी आपल्या पोस्टमध्ये मध्य प्रदेशातील जनतेला राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) भारत जोडो न्याय यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, देशात होत असलेल्या अन्याय, अत्याचार आणि शोषणाविरोधात राहुल गांधी रस्त्यावर उतरले असून, आता त्यांना साथ देण्याची वेळ आली आहे.

(Latest Marathi News)

R

भाजपमध्ये प्रवेशाची चर्चा -

काही माजी मुख्यमंत्री कमलनाथ भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. त्यांचा मुलगा नकुलनाथ आणि काही आमदारांसह ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र यानंतर त्यांनी भाजपप्रवेश केवळ अफवा असल्याचे फेटाळून लावले. आपण नेहमीच काँग्रेसचे सदस्य राहणार असल्याचे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT