Kangana Ranaut says she will not last on instagram more than week
Kangana Ranaut says she will not last on instagram more than week 
देश

अन् दोनच दिवसांत कंगना म्हणाली, मी इन्स्टाग्रामवर आठवडाभरही टिकणार नाही!

वृत्तसंस्था

मुंबई : वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत  (Kangana Ranaut) कोरोना पॉझिटिव्ह (Covid Positive) आली आहे. तिनेच इन्स्टाग्रामवर (Instagram) याची माहिती दिली होती. कोरोना हा एका छोटासा फ्लू असून, तो माझ्या शरीरात पार्टी करतोय, असे तारे तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये तोडले होते. यामुळे इन्स्टाग्रामने तिची पोस्ट डिलिट करुन तिला दणका दिला आहे. यावर कंगनाने पुन्हा वादग्रस्त पोस्ट केली आहे.  (Kangana Ranaut says she will not last on instagram more than week)  

देशात दररोज लाखो कोरोना रुग्ण सापडत असून, हजारो जणांचा मृत्यू कोरोनामुळे होते आहे. असे असतना कंगनाने असंवेदनशीलपणे केलेल्या या पोस्टवर मोठी टीका झाली होती. अनेकांनी तिला याचा जाब विचारला होता. ती चुकीची माहिती पसरवत असल्याचा ठपकाही तिच्यावर ठेवण्यात आला होता. अखेर कंगनाने तोडलेल्या या ताऱ्यांमुळे तिची पोस्ट इन्स्टाग्रामने डिलिट केली आहे. 

यावर कंगनाने इन्स्टाग्रामवर पुन्हा एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. यात तिने म्हटले आहे की, इन्स्टाग्रामने माझी पोस्ट डिलिट केली आहे. मी त्यात कोरोनाला नष्ट करण्याविषयी बोलले होते. यातून काही जणांच्या भावना दुखावल्या गेल्या. ट्विटरवर दहशतवादी आणि कम्युनिस्टांचे पाठीराखे असतात हे माहिती होते परंतु, कोरोना फॅन क्लब. हे खूपच भारी आहे. मी दोन दिवस झाले इन्स्टावर आले आहे. परंतु, येथे मी आठवडाभरापेक्षा जास्त काही काळ टिकण्याची शक्यता कमी आहे. 

दरम्यान, कंगनाचे ट्विटर अकाउंट काही दिवसांपूर्वी कायमस्वरुपी बंद करण्यात आले आहे. याला कारण आहेत कंगनाची प्रक्षोभक ट्विट. कंगनाने पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या हिंसाचाराबद्दल आक्षेपार्ह ट्विट केली होती. कंगनाचे वर्तन द्वेष पररवणारे आणि इतरांना दूषणे देणारे आहे, असे ट्विटरने म्हटले होते. कंगनाचे अकाउंट आधी ट्विटरने तात्पुरते बंद केले होते. 

ट्विटरच्या या कारवाईवर कंगनाचा तिळपापड झाला होता. तिने ट्विटरची गरजच नसल्याची भूमिका घेतली होती. तिने म्हटले होते की, माझा आवाज उठवण्यासाठी माझ्याकडे अनेक प्लॅटफॉर्म आहेत. तसेच, चित्रपटातील माझी कला हा ही एक प्लॅटफॉर्म माझ्यासाठी आहे. 

Edited by Sanjay Jadhav
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT