Kangana Ranaut
Kangana Ranaut  Sarkarnama
देश

Kangana Ranaut : कंगनाला भाजप लोकसभा तिकीट देणार का?, जे.पी.नड्डा म्हणाले..

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावतने राजकारणात प्रवेश करण्याचे संकेत दिले. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची इच्छा असेल तर मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे कंगनाने सांगितले. यावर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कंगनाचे स्वागत केले. त्या पक्षात सहभागी होण्यास इच्छुक असतील तर त्यांची जबाबदारी पक्षाकडून निश्चित केली जाईल, असेही नड्डा म्हणाले.

कंगनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर जेपी नड्डा म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे आमच्या पक्षाचे नेते, त्यांच्या प्रभावाने देशात चांगले वातावरण निर्माण झाले आहे. त्यांना यात सहभागी व्हायचे असेल तर स्वागत आहे. निवडणूक लढवण्याचा प्रश्न असेल तर तिकीट देण्याचा निर्णय माझा एकट्याचा नाही. विचारविनिमयानंतर याबाबत निर्णय घेतला जाईल.

'भाजपात कंगनाचे स्वागत आहे, पण ;

कंगना गेल्या काही काळापासून भाजप आणि त्यांच्या नेत्यांना पाठिंबा देत आहे. याचसोबत काँग्रेसचाही कंगनाने वेळोवेळी विरोध केला आहे. अशा स्थितीत नड्डा यांना विचारण्यात आले की कंगना रणौतला भाजपमध्ये स्थान असू शकते का? यावर ते म्हणाले की, होय, त्यांची पक्षात निश्चित जागा आहे, पण कोणत्या जबाबदारीवर काम करायचे, हे पक्ष ठरवते. कंगनाचे स्वागत आहे. पक्षात कोणी आले तर, तुम्हाला कोणत्याही अटीशिवाय यावे लागेल, त्यानंतर पक्ष जबाबदारी निश्चित करेल.

काय म्हणाली कंगना?

लोकांची सेवा करण्यासाठी राजकारणात येण्यास तयार असल्याचे कंगनाने सांगितले होते. कंगनाने भाषणात पंतप्रधान मोदींचे कौतुक करतानाच राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांचाही खरपूस समाचार घेतला. कंगना म्हणाल्या की, राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात स्पर्धा नाही. त्यांची तुलनाही होऊ शकत नाही. दुसरीकडे, अरविंद केजरीवाल यांची खिल्ली उडवत कंगना म्हणाल्या, हिमाचलच्या लोकांना मोफत वीज नको आहे.

येथील लोक स्वतःची वीज स्वत: बनवतात. राजकारणात येण्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली, "परिस्थिती कशीही असेल, सरकारला माझ्या सहभागाची गरज असेल तर, मी राजकारणात सहभागी होण्यासाठी तयार आहे. हिमाचल प्रदेशच्या लोकांनी मला सेवेची संधी दिली तर ती नक्कीच भाग्याची गोष्ट असेल, असं कंगना म्हणाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT