Kangna Ranaut
Kangna Ranaut Sarkarnama
देश

कंगना रानौतचं ठरलं ; 2024 ला 'या' मतदार संघातून लढवणार निवडणूक

सरकारनामा ब्युरो

Kangna Ranout नवी दिल्ली : आपल्या बेताल वक्तव्यांनी कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री कंगना रानौतने निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भाजपकडून आपल्याला तिकीट मिळाल्यास आपण निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे तिने म्हटले आहे. कंगना रनौतने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. जनतेची इच्छा असेल आणि भाजपने आपल्याला तिकीट दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे तिने म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना कंगनाने ही इच्छा व्यक्त केली. याचवेळी तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक करत त्यांना 'महान व्यक्ती' संबोधले आहे. हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीवर बोलताना रनौत म्हणाली की, हिमाचल प्रदेश आम आदमी पक्षाच्या (आप) खोट्या आश्वासनांना बळी पडणार नाही. हिमाचलच्या लोकांकडे स्वतःची सौर उर्जा आहे आणि लोक स्वतःच्या भाज्या स्वत: पिकवतात. हिमाचलमध्ये त्यांना मोफत घोषणांचा फायदा होणार नाही. हिमाचलच्या लोकांना फुकट काहीही नकोय, असा टोलाही कंगनाने लगावला आहे.

तसेच, राजकारणात आणखी लोकांनी पुढे यावे अशी माझी इच्छाही तिने व्यक्त केली. तर दुसरीकडे, बॉलीवूडमधील घराणेशाही संपू शकत नाही. पण आता प्रेक्षक जागरूक झाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. लोक आता बदलले आहेत, आता हे सर्व चालणार नाही, असा विश्वासही तिने व्यक्त केला आहे. तसेच, मी एक वर्ष ट्विटरवर होते पण ट्विटर मला एक वर्षही सहन करू शकले नाही, अशी मिश्किल टिपण्णीही तिने यावेळी केली.

दरम्यान, कंगनाचा 'इमर्जन्सी' चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. यामध्ये ती भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अनुपम खेर, सतीश कौशिक, श्रेयस तळपदे आणि मिलिंद सोमण यांच्याही भूमिका आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT