Kanpur Violence, BJP Nupur Sharma Latest Marathi News
Kanpur Violence, BJP Nupur Sharma Latest Marathi News Sarkarnama
देश

भाजपने निलंबित केलेल्या नुपूर शर्मांमुळे भिडले होते दोन गट; 29 जणांना अटक

सरकारनामा ब्युरो

कानपूर : भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. प्रेषित महंमद पैगंबर यांच्याबद्दल केलेले वादग्रस्त वक्तव्य त्यांना भोवलं आहे. पण शर्मा यांच्या वक्तव्यानंतर उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) कानपूरमध्ये शुक्रवारी (ता. 3) मोठी हिंसा झाली होती. याप्रकरणी आतापर्यंत 29 जणांना अटक करण्यात आले आहे. (Nupur Sharma Latest Marathi News)

ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर एका खासगी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान शर्मा यांनी प्रेषित पैगंबरांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्यावरून त्यांच्याविरोधात देशभरात रोष व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (BJP suspends Nupur Sharma and Naveen Jindal from party)

शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात कानपूरमध्ये स्थानिक मुस्लिम नेते हयात जाफर हाश्मी यांनी बंदची घोषणा केली होती. या बंददरम्यान शुक्रवारी दोन गट एकमेकांना भिडले होते. बाजारपेठेत जोरदार दगडफेक झाली होती. त्यामध्ये पोलीस कर्मचाऱ्यांसह 39 जण जखमी झाले. या घटनेनंतर पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना अटक केली आहे.

दरम्यान, नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांच्या वक्तव्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही गंभीरपणे दखल घेतल्याचे समजते. त्यामुळे पक्षाने दोघांनाही निलंबित करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी पक्षाकडून निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस अरूण सिंह यांनी याबाबतचे निवेदन प्रसिध्दीस दिले आहे.

काय म्हटले आहे निवदेनात?

भारताच्या हजार वर्षांच्या इतिहासात प्रत्येक धर्म वाढला आहे. भाजपकडून सर्व धर्मांचा सन्मान केला जातो. कोणताही धर्म किंवा धार्मिक व्यक्तींचा अपमान निंदनीय आहे. कोणत्याही धर्माचा अपमान करणाऱ्या विचारधारेविरोधात पक्ष आहे. भाजपकडून अशा कोणत्याही विचारधारेचा प्रचार केला जात नाही, असं निवेदनात स्पष्ट करून नुपूर शर्मा आणि जिंदाल यांच्या वक्तव्यांपासून हात झटकले आहेत.

भारताचे संविधान प्रत्येक नागरिकाला आपल्या पसंतीच्या धर्माचा अभ्यास करण्याचा अधिकार देते. संपूर्ण देश स्वातंत्र्याची 75 व्या वर्षाचा जल्लोष करत असताना आम्ही भारताला एक महान देश बनविण्यासाठी कटिबध्द आहोत. जिथे सर्वजण समान असती, प्रत्येकाचा सन्मान होईल, जिथे सर्व जण भारताची एकता आणि अखंडतेसाठी कटिबध्द असतील, जिथे सर्वांना विकासाचा फायदा होईल, असंही पक्षाकडून निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT