Kapil Sibal filed nomination for Rajya Sabha Latest Marathi News
Kapil Sibal filed nomination for Rajya Sabha Latest Marathi News Sarkarnama
देश

काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यानंतर दहा दिवसांतच लागली राज्यसभेची लॉटरी

सरकारनामा ब्युरो

लखनौ : काँग्रेसला दहा दिवसांपूर्वीच सोडचिट्ठी दिल्यानंतर कपिल सिब्बल यांना राज्यसभेची लॉटरी लागली आहे. त्यांनी समाजवादी पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी बुधवारी उत्तर प्रदेशातून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. त्यामुळे काँग्रेसला धक्का बसला आहे. (Kapil Sibal Latest Marathi News)

सिब्बल यांनी 16 मे रोजीच काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याचा गौप्यस्फोट माध्यमांशी बोलताना केला आहे. बुधवारी सकाळी त्यांनी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह पक्षाच्या प्रमुख नेत्यांसह उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी अर्ज दाखल केला. (Kapil Sibal filed nomination for Rajya Sabha)

सिब्बल यांनी नुकतीच लखनौमध्ये अखिलेश यांची भेट घेतली होती. त्यांनी पक्षाचे नेते आझम खान यांच्या जामीनासाठी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली होती. खान यांना नुकताच अंतरिम जामीन मिळाला आहे. अखिलेश यांच्या या भेटीतच राज्यसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचे मानले जात आहे.

उत्तर प्रदेशात पुढील महिन्यात राज्यसभेच्या 11 जागांसाठी मतदान होत आहे. यावेळी समाजवादीच्या जागा वाढल्याने त्यांची राज्यसभेत तीन जागा मिळणार आहेत. त्यामुळे सिब्बल यांना संधी देण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून सिब्बल यांना राज्यसभेत पुन्हा पाठवण्याची अजिबात शक्यता नव्हती. त्यामुळे सिब्बल यांनी समाजवादीच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सिब्बल अनेक दिवसांपासून होते नाराज

काँग्रेसमधील नाराज नेत्यांच्या जी 23 गटातील प्रमुख नेते कपिल सिब्बल मागील काही महिन्यांपासून सिब्बल हे सातत्याने काँग्रेसमधील नेतृत्वावरून निशाणा साधत होते. राहुल गांधी व प्रियांका गांधींवर त्यांनी उघडपणे टीका केली होती. नुकत्याच उदयपूर येथे झालेल्या चिंतन शिबीरातही त्यांची अनुपस्थिती खटकली होती.

कपिल सिब्बल यांनी एका मुलाखतीत गांधी कुटुंबावर निशाणा साधला होता. त्यांनी काँग्रेसचे नेतृत्व सोडत इतरांना संधी द्यायला हवी, असं स्पष्ट केलं होतं. राहुल गांधी हे पक्षाचे अध्यक्ष नसले तरी तेच निर्णय घेत असल्याची टीकाही सिब्बल यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT