sonia gandhi, rahul gandhi sarkarnama
देश

Karnataka Election 2023 : राहुल गांधींबाबत सोनिया चिंतीत ; त्यांची गॅरंटी कोण घेणार ? ; भाजपचा मिश्किल सवाल

Karnataka Election 2023 : अमेठीतील लोक संभ्रमात आहेत, त्यांनी इतके वर्ष गांधी परिवाराला कसे काय समर्थन दिले, निवडून आणले.

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election 2023 : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचाराच्या तोफा उद्या (सोमवारी) थंडावणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या रोड शो मुळे कर्नाटकातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. (karantaka election himanta biswa sarma asks who will take gurantee of rahul gandhi)

या परिस्थितीत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्मा सरमा यांनी काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्यावर जहरी टीका केली आहे.

हिमंत बिस्मा सरमा म्हणाले, "भाजप तुम्हाला गॅरंटी देत आहे, पण राहुल गांधी यांची गॅरंटी कोण घेईल. तुम्हाला माहित असेल की राहुल गांधी हे उत्तरप्रदेशाचे खासदार होते, पण पराभव झाल्यानंतर ते केरळला निघून गेले. त्यामुळे त्यांची गॅरंटी कोण घेणार, अमेठीतील लोक संभ्रमात आहेत, त्यांनी इतके वर्ष गांधी परिवाराला कसे काय समर्थन दिले, निवडून आणले,"

"निवडणुका हरल्यानंतर ते येथून बाहेर निघून जातात. गेल्या पाच वर्षात ते अमेठीला कधी गेले नाहीत. ज्यांचा स्वतःवर विश्वास नाही, अशा व्यक्तींवर तुम्ही कसा विश्वास ठेवतील," असे मुख्यमंत्री म्हणाले.

कधी दाढी ठेवतात. कधी क्लीन शेवमध्ये..

"राहुल गांधी कधी दाढी ठेवतात. कधी क्लीन शेवमध्ये दिसतात. एका दिवशी ते बटाट्याविषयी बोलतात, दुसऱ्या दिवशी वेगळचे काहीतरी बोलतात, " असे ते म्हणाले.

वीस वर्षांपासून ही लढाई त्या एकट्या लढत आहेत..

"त्यांना कसे सांभाळायचे, याबाबत त्यांची आई सोनिया गांधी या पण त्यांच्या अशा वागणुकीमुळे चिंतीत आहेत. सोनिया गांधी गेल्या वीस वर्षांपासून ही लढाई एकट्या लढत आहेत. आपल्या मुलासाठी सुरक्षित जीवन कसे असेल, याबाबत त्यांना चिंता आहे, असे हिमंत बिस्मा सरमा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. "राहुल गांधी सारखा व्यक्ती कर्नाटकच्या जनतेला काय गॅरंटी देणार," असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटकमध्ये येत्या बुधवारी (ता.१० ) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तर, १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्ष यांच्यात प्रमुख लढत होत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यात पॉपुलर फ्रंट आँफ इंडिया आणि बजरंग दल या संघटनेवर कारवाई करण्याचा दावा केला आहे. यावरुन राजकारण पेटलं आहे. याप्रकरणी बजरंग दलाने काँग्रेसच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या विरोधात ११० कोटी रुपयाचा मानहानीचा दावा ठोकला आहे.

याबाबत चंडीगढ येथील विश्व हिंदू परिषदेच्या कायदा सेलचे सहप्रमुख वकील साहिल बंसल यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटिस पाठवली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT