बंगळुरू - कर्नाटकमध्ये विधानसभेची निवडणूक आता नजीक येऊन ठेपलेली आहे. मात्र या निवडणुका तोंडावर असताना कर्नाटकमधील सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का बसला आहे. कर्नाटकच्या सरकारमधील माजी मंत्री आणि मोठे खाण व्यावसायिक जी. जनार्दन रेड्डी यांनी आज भाजपाला रामराम ठोकला. इतकेच नाही, तर यानंतर त्यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याचे जाहीर केले. गेली दोन दशकांहून अधिक काळ जनार्दन रेड्डी यांचं भाजपाशी नातं होतं. आता भाजपची साथ सोडून ते कल्याण राज्य प्रगती पक्ष नावाचा पक्ष स्थापन करणार आहेत.
कर्नाटकातीव बेल्लारी हा जिल्हा रेड्डी बंधूंचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र आपण कोप्पल जिल्ह्यातील गंगावती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जनार्दन रेड्डी यांनी सांगितले. ते म्हणाले की, आज मी माझ्या कल्याण राज्य प्रगती पक्षाची इथे घोषणा करत आहे. हा पक्ष माझे विचार अन् बासवण्णा यांचे सोबत विचार घेऊन पुढे मार्गक्रमण करेल. धर्म आणि जाती भेदाभेद आणि फुटीरतावादी राजकारणाच्या विरोधात आहे.
या पक्षाचे विचार तळागाळात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी, संपूर्ण कर्नाटक पिंजून काढण्यासाठी यात्रा काढणार असल्याचे ही त्यांनी जाहीर केले आहे. मागील २०१८ साली झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत यांनी भाजपाचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी, एका प्रश्नाचं उत्तर देताना भाजप आणि जनार्दन रेड्डी यांच्यात काही देणंघेणं नसल्याचे विधान केले होते. यामुळे भाजप आणि रेड्डी सबंध आणखीनच बिघडले गेले.
दरम्यान,रेड्डी म्हणाले की,मी गंगावती मतदारसंघात एक घर बांधलं आहे. तेथील मतदार यादीत सुद्धा माझ्या नावाचा समावेश आहे. यापुढे मी गंगावतीमधूनच निवडणूक लढवणार आहे. कोट्यवधींच्या बेकायदेशीर खाणकाम भ्रष्टाचार प्रकरणात जनार्दन रेड्डी २०१५ सालापासू जामिनावर मुक्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाने जामीन देताना त्यांना आदेशात त्यांच्यावर अनेक अटी व बंधने घातले आहेत. यामध्ये त्यांना त्यांच्या कर्नाटकमधील बेल्लारी आणि आंध्र प्रदेशमधील कडप्पा जिल्ह्यात प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.