Mallikarjun_Kharge
Mallikarjun_Kharge  sarkarnama
देश

karnataka Congress : काँग्रेस उमेदवाराची पहिली यादी बुधवारी जाहीर होणार ; ६१ विद्यमान आमदारांना..

सरकारानामा ब्युरो

karnataka assembly election 2023 congress first list of candidates : कर्नाटक विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने संभाव्य उमेदवाराची पहिली यादी केली आहे. ही यादी बुधवारी (ता.२२ मार्च) जाहीर केली जाईल, अशी माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, कर्नाटक माजी मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी दिली.

नवी दिल्ली येथे केंद्रीय निवडणुक समितीच्या बैठकीनंतर सिद्धारमैया माध्यमांशी बोलत होते. "या बैठकीत आगामी निवडणूक, राहुल गांधी यांचा राज्यातील दौरा या विषयी चर्चा झाली," असे सिद्धारमैया यांनी सांगितले.

सिद्धारमैया म्हणाले, "20 मार्च रोजी राहुल गांधी यांचा कर्नाटकात दौरा आहे. बेळगाव येथे राज्यस्तरीय युवक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या रॅलीत राहुल गांधी सहभागी होणार आहेत. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. २२ मार्च रोजी उगादी सणानिमित्त सकाळी उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात येणार आहे,"

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत १२५ उमेदवाराची नावे निश्चित करण्यात आली आहे. यात ६१ विद्यमान आमदार आहेत. केंद्रीय निवडणूक समितीने काही दिवसापूर्वी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या होत्या. यातून निश्चित केलेली यादी अंतिम मंजूरीसाठी पाठविण्यात आली होती.

कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार म्हणाले, " विद्यमान सर्व आमदारांना पुन्हा तिकीट मिळणार आहे. या सर्व आमदारांनी चांगले काम केले आहे. निवड समितीने त्यांची नावे अंतिम केली आहे. निवडणुकीत कुठल्याही पक्षाची युती काँग्रेस करणार नाही," "पक्षश्रेष्ठीं मला ज्या मतदार संघातून उमेदवारी देतील, येथून मी निवडणूक लढविणार," असे सिद्धारमैया यांनी सांगितले.

कर्नाटकमध्ये विधानसभेच्या एकूण २२४ जागांपैकी १५० जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य आहे. येथे जनता दल (एस) यांनी आपल्या ९३ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. पण अद्याप काँग्रेस आणि भाजपने आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT