Karnataka Cabinet to be Expanded
Karnataka Cabinet to be Expanded  Sarkarnama
देश

Karnataka Politics : कर्नाटकात आज 'हे' २४ आमदार होणार मंत्री..

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Cabinet to be Expanded Today : कर्नाटक सरकारचा आज (27 मे) मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यात 24 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. आज शनिवारी दुपारी शपथविधी होणार असल्याचे कर्नाटक काँग्रेसचे प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी सांगितले. (karnataka cabinet to be expanded today 24 more ministers to join siddaramaiah government)

सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री व डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून वीस मे रोजी शपथ घेतली . त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा प्रियांक खरगे यांच्यासह 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.  (Breaking Marathi News)

ज्येष्ठ आमदार एच.के. पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चैलुलरायस्वामी, के वेंकटेश, एच.सी. महादेवप्पा, काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष ईश्वर खंडे, माजी प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडु राव , शिवानंद पाटील, रहीम खान, मंकल वैद्य, डी. सुधाकर, संतोष एस लाड, एन.एस. बोस राजू, सुरेश बी.एस, मधु बंगारप्पा आदी आज मंत्रीपदासाठी शपथ घेणार आहेत.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी काल (शुक्रवारी) सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर मंत्रीपदाच्या नावावर अंतिम निर्णय झाला.

यापूर्वी डॉ. जी परमेश्वरा, के. एच. मुनियप्पा, के.जे. जॉर्ज व एम.बी. पाटील यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले आहे. तर सतीश जारकीहोळी, प्रियांक खरगे (मल्लिकार्जुन खरगे यांचा मुलगा), रामलिंगा रेड्डी व जमीर अहमद खान यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT