karnataka chief minister b s yediyurappa changes profiles of ministers in 24 hours
karnataka chief minister b s yediyurappa changes profiles of ministers in 24 hours 
देश

मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी तोंडावर पाडलं...24 तासांत खातेबदल करण्याची नामुष्की

वृत्तसंस्था

बंगळूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस.येडियुरप्पा यांनी नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात सात आमदारांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली होती. या मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ झाला होता. आता खातेवाटपावरुन वाद झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी काल खातेवाटप जाहीर केले होते. त्यांना 24 तासांच्या आत खातेबदल करण्याच्या नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. 

कर्नाटकातील मंत्रिमंडळ विस्ताराचे भिजत घोंगडे मागील वर्षभरापासून कायम होते. यामुळे अनेक नेते नाराज होते. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले नेते अस्वस्थ झाले असून, ते मुख्यमंत्री येडियुरप्पा आणि सरकारला लक्ष्य करीत होते. अखेर मंत्रिमंडळ विस्तार येडियुरप्पांनी जाहीर केला होता. एमटीबी नागराज, उमेश कत्ती, अरविंद लिंबावली, मुरूगेश निरानी, आर. शंकर, सी.पी.योगेश्वर, अंगारा एस. यांना कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले होते. त्यांचा नुकताच शपधविधी झाला होता.   

मुख्यमंत्र्यांनी काल खातेवाटप जाहीर केले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांच्या नाराजीमुळे 24 तासांच्या आत खातेबदल करावा लागला आहे. जे.सी.मधुस्वामी यांना आधी कन्नड व संस्कृती खाते देण्यात आले होते. त्यांना आता हज व वक्फ खात्याची जबाबदारी देण्यात आली होती. अरविंद लिंबावली यांना वन खाते देण्यात आले होते. त्यांच्याकडे कन्नड व संस्कृती खाच्याचा कार्यभारही देण्यात आला आहे. एम.टी.बी.नागराज हे उत्पादन शुल्क खाते मिळाल्याने नाराज होते. त्यांना आता महापालिका प्रशासन आणि ऊस विकास व साखर संचालनालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी आत के.पी.गोपालय्या यांना देण्यात आली आहे. त्यांना आता फलोत्पादन व ऊस विकास खाते देण्यात आले होते. आर. शंकर यांनी महापालिका प्रशसासनाऐवजी फलोत्पादन खाते मिळाले आहे. के.सी. नारायण गौडा यांना हज व वक्फच्या ऐवजी नियोजन, कार्यक्रम अंमलबजावणी आणि सांख्यिकी खाते देण्यात आले आहे. ॉ

काल खातेवाटप झाल्यानंतर नागराज, गोपालय्या, मधुसूदन आणि नारायण गौडा यांनी नाराजी व्यक्त केली होती. मधुस्वामी वगळता सर्व नवीन मंत्री हे इतर पक्षांतून भाजपमध्ये दाखल झालेले आहेत. त्यांनी येडियुरप्पांची सत्ता येण्यास 2019 मध्ये मदत केली होती. काही मंत्र्यांनी काल मंत्रिमंडळ बैठकीलाही दांडी मारली होती. 

मंत्रिमंडळ विस्तारावरुन मोठा गदारोळ सुरू झाला होता. भाजपच्या काही आमदारांनी उघड बंडाची भाषा सुरू केली आहे. ब्लॅकमेलिंगद्वारे आणि पैसे घेऊन मंत्रिपदाचे वाटप सुरू असल्याचा खळबळजनक आरोपही झाला होता. यावर येडियुरप्पा संतापले असून, त्यांनी पक्षांतर्गत विरोधकांना थेट इशारा दिला होता. 

Edited by Sanjay Jadhav

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT