DK Shivakumar CM claim Sarkarnama
देश

DK Shivakumar CM claim : शिवकुमार मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार? आमदारानं तारीख सांगितल्याने खळबळ

Karnataka Politics Claim That DK Shivakumar Will Take Oath as CM Sparks Buzz : कर्नाटक राज्यातील सत्ताधारी काँग्रेसमधील सिद्धरामय्या अन् डीके शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदावरून अंतर्गत राजकीय संघर्ष सुरू आहे.

Pradeep Pendhare

Karnataka Congress : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे पुत्र यतींद्र सिद्धरामय्या यांनी राज्यात नेतृत्वात कोणताही बदल होणार नसल्याचे विधान केल्यानंतर, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचे कट्टर समर्थक आणि काँग्रेस आमदार एच. ए. इक्बाल हुसेन यांनी आमचे ध्येय शिवकुमार यांना मुख्यमंत्री बनवण्याचे आहे. सहा जानेवारीला ते मुख्यमंत्री होतील, असं स्फोटक विधान करत खळबळ उडवून दिली.

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपद शिवकुमार यांना सोपवावे, अशी आमची मागणी असून, यावर काँग्रेस हायकमांड सकारात्मक प्रतिक्रिया देत असल्याचेही त्यांनी सांगितले.

सहा जानेवारी या तारखेच्या महत्त्वाबाबत विचारले असता, हुसेन म्हणाले की, "सहा आणि नऊ जानेवारीला शिवकुमार यांचे भाग्यवान दिवस आहेत. आमचा कोणताही गट नाही. सिद्धरामय्या आणि शिवकुमार (DK Shivakumar) हे दोघेही राज्याची संपत्ती आहेत. शिवकुमार यांना त्यांच्या संघर्षाचे आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळावे, हीच आमची अपेक्षा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

परमेश्वर मुख्यमंत्री व्हावेत

याचदरम्यान, भाजपचे (BJP) केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमण्णा यांनी, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छा व्यक्त केली आहे. तुमकूर इथं झालेल्या कार्यक्रमात बोलताना सोमण्णा म्हणाले, ‘‘सत्तेत असणे हा एक आशीर्वाद आहे. परमेश्वर केवळ गृहमंत्री म्हणून राहणार नाहीत. फक्त मीच नव्हे, तर तुमकुरचे नागरिकही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहू इच्छितात.’’

इक्बालच्या विधानावर विश्वास नको

समर्थक आमदाराच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शिवकुमार यांनी इक्बाल यांनी केलेला दावा फेटाळून लावला. ते म्हणाले, ‘‘इक्बाल हुसेन जे म्हणतात, त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये. त्यांना बोलण्याची सवय आहे. मी त्यांच्यावर कारवाई करेन.’’

शिवकुमार दिल्लीला रवाना

कर्नाटकासह देशातील अनेक भागांत कथित मतचोरीच्या विरोधात आज होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी डीके शिवकुमार दिल्लीला रवाना झाले. काँग्रेसने आधीच मतचोरीविरोधात व्यापक जनजागृती मोहीम सुरू केली आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात कर्नाटकातून 100हून अधिक काँग्रेसचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. आंदोलनात मुख्यमंत्री सिद्धरामय्या देखील सहभागी होणार असून तेही दिल्लीला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT