Karnataka Aseembly Election 2023 Exit Poll : कर्नाटक विधानसभा निवडणुकांसाठी आज मतदान पार पडले. अडीच हजारापेक्षा जास्त उमेदवारांचं भविष्य इव्हीएम' मध्ये बंद झाले आहे. मतदान प्रक्रिया झाल्यानंतर आता एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. वेगवेगळ्या एक्झिट पोलची आकडेवारी समोर येत आहे. (Latest Marathi News)
बहुतांश एक्झिट पोलने काँग्रेसला बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. असे असले तरी एकूण दोन संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकात भाजपला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. न्यूज नेशनच्या सीजीएस या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ११४ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर काँग्रेसला फक्त ८६ जागा देण्यात आले आहेत. तसेच जेडीएसला २१ जागा मिळतील असाही अंदाज व्यक्त केला आहे.
सुवर्ण न्यूज- जन की बात या संस्थेच्या एक्झिट पोलनुसार भाजपला ९४ ते ११७ जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्य़ात आला आहे. तर काँग्रेसला ९१ ते १०६ जागा मिळतील असेही सांगितले आहे. तर जेडीएसला १४ ते २४ जागा मिळण्याची शक्यता आहे .
बहुतांश एक्झिट पोल काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त केलेला असताना, या दोन संस्थांनी मात्र भाजपला (BJP) कर्नाटकात स्पष्ट बहुमत मिळेल, असा इतरांपेक्षा वेगळा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आता १३ मे रोजी कोणाचे एक्झिट पोल खरे ठरणार हे पाहणे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.