Karnataka politics : विशेष मतदार यादी पुनरिक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान निवडणूक आयोगाच्या फॉर्म-7 अर्जांच्या प्रकरणावरून राज्यातील विविध ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरू झाले आहे.
ही कारवाई सरकारला खुश करण्यासाठी होत असल्याचा आरोप करत भाजप नेत्यांनी कारवाई थांबवावी अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर भाजप (BJP) नेते माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र, विधानसभेतील विरोधी पक्षनेते आर. अशोक, विधान परिषद विरोधी पक्षनेते चलवादी नारायणस्वामी, आमदार अश्वत्थ नारायण आणि खासदार पी. सी. मोहन या नेत्यांनी पोलिस महासंचालक व पोलिस महानिरीक्षक (डीजी-आयजीपी) डॉ. एम. ए. सलीम यांची भेट घेत निवेदन दिले.
येडियुराप्पा यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत भाजप कार्यकर्त्यांविरुद्ध दाखल केलेले गुन्हे थांबवावेत, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. फॉर्म-7 अर्ज योग्य असल्यास त्यांचा विचार करावा आणि नियमबाह्य असल्यास निवडणूक नियमांनुसार ते फेटाळावेत. मात्र, सरकारला (Government) खूश करण्यासाठी पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
अशोक यांनी फॉर्म-7 दाखल करणे, हा नागरिकांचा घटनात्मक अधिकार असल्याचे म्हटले. या अर्जांच्या माध्यमातून मतदार यादीतील कथित अनियमिततेवर आक्षेप नोंदविण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी सांगितले. बंगळुरातील कोगिलू ले-आउटमध्ये बेकायदा बांगलादेशी स्थलांतरितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला. फॉर्म-7 निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून, तो कोणीही मिळवून दाखल करू शकतो. भाजप किंवा आरएसएस कार्यालयांमध्ये फॉर्म छापून वाटल्याचा आरोप चुकीचा असल्याचे अशोक यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सत्ताधारी काँग्रेसने फॉर्म-7चा भाजप-आरएसएस आणि जेडीएसकडून गैरवापर होऊन, मतदारांची नाव वगळण्याचे कटकारस्थान केल्याचा आरोप करत, मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या दालनात आंदोलन केले होते. मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. मुख्य निवडणूक अधिकारी यांनी यावर कार्यवाहीचे आदेश फौजदारीची सूचना केली होती.
सत्ताधारी काँग्रेस अन् विरोधक भाजप फॉर्म-7वरून राज्यात आमने-सामने आले आहे. गुन्हे दाखल होण्याची कारवाई सुरू झाल्याने विरोधक भाजप नेते कार्यकर्त्यांसाठी मैदानात उतरले आहेत. पोलिसांच्या या कारवाईवरून अन् सत्ताधारी काँग्रेसच्या आरोपांवरून, फॉर्म-7चा कुठेतरी गैरवापर होत असल्याची चर्चा देखील रंगली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.