Lakshmi Hebbalkar, Sanjay Patil Sarkarnama
देश

Sanjay Patil News : शांत झोपेसाठी एक पेग जास्त घ्या! भाजप नेत्याचं महिला मंत्र्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य

Rajanand More

Karnataka News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला असून विविध पक्षातील नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळेही गाजत आहे. त्यामध्ये भाजप, काँग्रेससह सर्वच पक्षांतील नेत्यांचा समावेश आहे. कर्नाटकातही भाजपच्या माजी आमदारांच्या विधानाने राजकारण तापलं आहे. त्यांनी थेट महिला व बाल विकास मंत्र्यांविषयी वक्तव्य करत वाद ओढवून घेतला आहे. (Sanjay Patil News)

भाजपचे माजी आमदार संजय पाटील यांनी राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री लक्ष्मी हेब्बलकर (Lakshmi Hebbalkar) यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी हेब्बलकर यांना शांत झोपेसाठी झोपेची गोळी किंवा एक पेग जास्त घ्यायला हवा, असे म्हटले आहे.

हेब्बलकर यांचे पुत्र मृणाल हे बेळगाव लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात प्रचार करताना पाटील म्हणाले, बेळगावमध्ये भाजपला महिलांचा वाढता प्रतिसाद पाहता हेब्बलकर यांना चांगली झोप येणार नाही. रमेश जारकीहोळी यांना प्रचार करताना पाहूनही त्यांना अवघड जाईल. त्यांनी झोपेसाठी झोपेची गोळी किंवा एक पेग जास्त घ्यावा, असे पाटील यांनी म्हटलं होतं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

हेब्बलकर यांनी पाटील यांच्यासह भाजपवर निशाणा सादला आहे. त्यांनी म्हटले आहे की, महिलांविषयी भाजपला असलेला आदर यातून दिसतो. भाजपचा हा छुपा अजेंडा आहे. केवळ श्रीरामाचा नारा अन् बेटी बचाओ, बेटी पढाओचा नारा पुरेसा नाही, महिलांचा आदरही करायला हवा. हा केवळ माझा अनादर नाही तर राज्य आणि देशातील महिलांचा अनादर आहे.

दरम्यान, मृणाल रविंद्र हेब्बलकर यांच्याविरोधात भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे आव्हान आहे. शेट्टार यांनी विधानसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांना भाजपने तिकीट नाकारले होते. पराभव झाल्यानंतर ते पुन्हा लोकसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये परतले. यावेळी मात्र भाजपने त्यांना उमेदवारी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT