Congress MLA news : काँग्रेस पक्षाच्या आमदाराची आमदरकी रद्द करण्याचा निर्णय कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला आहे. कर्नाटक राज्याच्या कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातील आमदार के. वाय. नंजेगौडा यांच्या आमदारकीबाबत हा निर्णय दिला आहे.
कर्नाटक उच्च न्यायालयाने त्यांची निवड अवैध घोषित करताना, 2023च्या राज्य विधानसभा निवडणुकीत टाकलेल्या मतांची मतमोजणी पुन्हा करण्याचा आदेश दिला आहे.
काँग्रेसचे (Congress) के. वाय. नंजेगौडा यांच्याविरुद्ध पराभूत झालेल्या भाजपचे के. एस. मंजुनाथ गौडा यांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सुनावणी करणाऱ्या न्यायमूर्ती आर. देवदास यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. या याचिकेत मतमोजणी प्रक्रियेत अनियमितता असल्याचा आरोप केला आहे. जवळजवळ दोन वर्षे चाललेल्या खटल्यानंतर न्यायालयाने फेरमतमोजणीचे आदेश देताना, के. वाय. नंजेगौडा यांची निवडणूक अवैध घोषित केली.
के. वाय. नंजेगौडा यांच्या वकिलांच्या युक्तिवादावर उच्च न्यायालयाने (Court) त्यांची आमदारकी अवैध ठरविण्याच्या स्वतःच्या आदेशाला 30 दिवसांसाठी स्थगिती दिली. यामुळे नंजेगौडा यांना सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची मुभा मिळाली आहे. जर त्या कालावधीत सर्वोच्च न्यायालयाकडून कोणतेही निर्देश मिळाले नाहीत, तर आमदाराची जागा अवैध ठरेल. पुन्हा मतमोजणी केली जाईल.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे के. वाय. नांजेगौडा यांना 50 हजार 955 तर, भाजपचे मंजुनाथ गौडा 50 हजार 707 मते मिळाली होती. याशिवाय त्यांच्या मतदारसंघात अपक्ष उमेदवार हुडी विजय कुमार यांना 49 हजार 362, धजदचे उमेदवार जी. ई. रामेगौडा यांना 17 हजार 627 मते मिळाली होती.
कर्नाटकात मे 2023मध्ये विधानसभा निवडणूक झाली. त्या निवडणुकीत बाजी मारून कॉंग्रेसने त्या राज्याची सत्ता हस्तगत केली. नंजेगौडा यांनी कोलार जिल्ह्यातील मालूर मतदारसंघातून निसटता विजय मिळवला. त्यांनी अवघ्या 248 मतांच्या फरकाने भाजपचे उमेदवार के.एस.मंजुनाथ गौडा यांचा पराभव केला. काँग्रेस आणि भाजपच्या उमेदवारांमध्ये मतांच्या विजयाचे अंतर खूपच कमी होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.