Prajwal Revanna Sarkarnama
देश

Prajwal Revanna rape case : माजी खासदार प्रज्वल रेवण्णाच्या भविष्याचा फैसला 30 जुलैला; बलात्काराच्या चार गुन्ह्यांपैकी एकाचा निकाल लागणार

Karnataka JD(S) Ex-MP Prajwal Revanna Rape Case Verdict on July 30 : माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी धमकीचे चार गुन्ह्यांचे प्रकरण लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच गाजले.

Pradeep Pendhare

Karnataka former MP court verdict : जनता दल (धर्मनिरपेक्ष) नेते आणि माजी खासदार प्रज्वल रेवण्णा याच्याविरोधात दाखल बलात्कार, लैंगिक अत्याचार आणि गुन्हेगारी धमकीचे चार गुन्ह्यांचे प्रकरण लोकसभा निवडणुकीपूर्वी चांगलेच गाजले.

28 एप्रिल ते 10 जून 2024 दरम्यान कर्नाटकमधील होलेनारसीपुरा पोलिस ठाण्यामध्ये हे गुन्हे दाखल आहेत. बेंगळुरूमधील सायबर क्राईम ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. चार अत्याचार प्रकरणांपैकी एका प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून, न्यायालयाने 30 जुलैपर्यंत निकाल राखून ठेवला आहे.

कर्नाटक (Karnataka) राज्यातील होळेनरसीपूर (जि. हासन) इथं प्रज्वल रेवण्णा यानं घरकाम करणाऱ्या महिलेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी निकाल राखून ठेवला. एसएसपी बी. एन. जगदीश आणि अशोक नाईक यांनी सरकारी वकील म्हणून युक्तिवाद केला, तर वरिष्ठ वकील नलिना मायागौडा यांनी प्रज्वल रेवण्णा याच्यावतीनं युक्तिवाद केला.

न्यायमूर्ती संतोष गजानन भट यांनी 30 जुलैला निकाल राखून ठेवला असून, प्रज्वलच्या भवितव्याचा निर्णय त्याच दिवशी होईल. जर न्यायालयाने (Court) प्रज्वलला दोषी ठरवले, तर त्याला कमीत कमी 10 वर्षे आणि जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा होऊ शकते. विशेष तपास पथकाने (एसआयटी) महिलेवरील अत्याचार प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आले.

सीआयडी निरीक्षक शोभा यांनी तपासाचे नेतृत्व केले आणि 26 साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि सुमारे 2000 पानांचे आरोपपत्र लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयात सादर केले. प्रज्वलविरुद्ध आणखी तीन अत्याचारांचे खटले न्यायालयात प्रलंबित आहेत.

प्रज्वलला गेल्या वर्षी मे महिन्यात जर्मनीहून परतल्यानंतर बंगळूर विमानतळावर एसआयटीने अनेक महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक केली होती. तेव्हापासून प्रज्वल बंगळूरच्या परप्पन अग्रहार तुरुंगात आहे. प्रज्वलचे वडील माजी मंत्री एच. डी. रेवण्णा यांना त्याच प्रकरणात अटक केली होती. तथापि, नंतर त्यांना जामीन मंजूर केला आणि तक्रारीत आरोपी म्हणून नाव असलेल्या रेवण्णाची आई भवानी रेवण्णा यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. अशा प्रकारे त्या अटकेपासून वाचल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT