Karnataka Lokayukta raid Kalakappa Nidagundi corruption Sarkarnama
देश

Karnataka Lokayukta Raid: 15 हजार रुपयांची सॅलरी असलेल्या क्लार्ककडे आढळले 24 घरं, 4 आलिशान कार अन् सोन्या-चांदीचं घबाड

Karnataka Lokayukta raid Kalakappa Nidagundi corruption:कर्नाटकातील लोकायुक्तांनी राज्यात भष्ट्राचाराच्या विरोधात राबविण्यात आलेली मोहीम अधिक तीव्र केली आहे. हासन, चिक्कबल्लापुर, चित्रदुर्ग आणि बेंगलुरुमध्ये पाच सरकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे.

Mangesh Mahale

✅ 3-पॉइंट सारांश (Summary):

  1. माजी क्लर्ककडे 30 कोटींची बेहिशेबी संपत्ती: केवळ 15 हजार रुपये पगार असलेल्या कलाकप्पा निदागुंडी याच्याकडे आलिशान मालमत्ता, जमिनी व मोटारी आढळल्याने लोकायुक्तांनी मोठी कारवाई केली.

  2. 96 प्रकल्पांमध्ये 72 कोटींचा गैरव्यवहार: निदागुंडी याने माजी इंजिनिअरच्या मदतीने बनावट कागदपत्रांद्वारे सरकारी निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

  3. राज्यात भ्रष्टाचारविरोधी छापेमारी तीव्र: अनेक जिल्ह्यांतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर छापे; IAS अधिकारी, अभियंते, डॉक्टर, उपअधिकाऱ्यांपर्यंत तपास पोहोचला आहे.

बेंगलुरु: कर्नाटकात भष्ट्राचाराच्या विरोधात मोहीम सुरु आहे. या अंतर्गत लोकायुक्त अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे. ग्रामीण विकास विभागात (KRIDL) माजी क्लर्क असलेल्या एका व्यक्तीच्या घरी छापेमारी केली. यात 30 कोटी रुपये आणि बेहिशेबी मालमत्ता आढळल्याचे लोकायुक्त अधिकाऱ्यांनी सांगितले.

कलाकप्पा निदागुंडी असे त्या क्लर्क चे नाव असून त्याचे मासिक वेतन 15 हजार रुपये होते. त्याच्याकडील आलिशान मोटारी, प्लॅट, प्लॅाट, सोने-चांदीच्या वस्तु पाहून अधिकाऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

कलाकप्पा निदागुंडी याच्याकडे 24 सदनिका, 4 प्लॅाट, 40 एकर शेतजमीन, 4 आलिशान कार, 350ग्राम सोने, 1.5 किलो चांदी असल्याचे चौकशीत आढळले आहे. ही संपत्ती कलाकप्पा निदागुंडी यांच्या स्वत:च्या नावे, पत्नी, मेहण्याच्या नावे आहे. निंदागुडी याने KRIDL चे माजी इंजिनिअर झेड.एम.चिंचोलकर यांच्याशी संगनमत करुन 96 अपूर्ण प्रोजेक्टसाठी बनावट कागजपत्रे सादर करुन सुमारे 72 कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचा दावा लोकायुक्त अधिकाऱ्यांनी केला आहे.

कर्नाटकातील लोकायुक्तांनी राज्यात भष्ट्राचाराच्या विरोधात राबविण्यात आलेली मोहीम अधिक तीव्र केली आहे. हासन, चिक्कबल्लापुर, चित्रदुर्ग आणि बेंगलुरुमध्ये पाच सरकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने विविध ठिकाणी छापेमारी केली आहे.

यात NHAI हासनचे कार्यकारी अभियंता जयन्ना आर. ग्रामीण जल व आरोग्य विभाग चिक्कबल्लापुरचे जुनियर अभियंता अंजनेय मुरली एम, चित्रदुर्गचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. वेंकटेश, बीबीएमपी दसराहल्लीचे उपअधिकारी एन वेंकटेश, ओम प्रकाश आदींची चौकशी करण्यात आली आहे.

IAS अधिकारी रडारवर

काही दिवसापूर्वी लोकायुक्ताच्या आठ IAS अधिकाऱ्यांनी 41 ठिकाणी छापेमारी केली होती. यात 37.42 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. यात कोट्यवधी रुपये, घर, आलिशान मोटारी, शेतजमिन, सोने-चांदी जप्त करण्यात आली होती. सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचे पगार, संपत्ती यावर लोकायुक्तांची कडक नजर आहे. सातत्याने होत असलेल्या छापेमारीमुळे सरकारी बाबूचं धाबे दणाणले आहे.

गेल्या काही वर्षात सरकारी योजनामधील भष्ट्राचार उघडकीस आला आहे. लोकायुक्तांकडून होत असलेल्या कारवाईमुळे भष्ट्र अधिकारी, कर्मचाऱ्यांची नावे पुढे येत आहे. सामान्य नागरिक अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रारी देत आहे.

✅ 4 FAQs with One-Line Answers:

Q1. कलाकप्पा निदागुंडी कोण होते?
ते KRIDL मध्ये माजी क्लर्क होते, ज्यांच्याकडे बेहिशेबी 30 कोटींची संपत्ती सापडली आहे.

Q2. भ्रष्टाचाराची रक्कम किती असल्याचा आरोप आहे?
सुमारे 72 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप लोकायुक्तांनी केला आहे.

Q3. लोकायुक्तांनी कोणत्या ठिकाणी छापे टाकले?
हासन, चिक्कबल्लापूर, चित्रदुर्ग आणि बेंगळुरूमधील विविध ठिकाणी छापेमारी करण्यात आली.

Q4. IAS अधिकाऱ्यांविरोधात काय कारवाई झाली?
लोकायुक्तांनी 41 ठिकाणी छापे टाकून 37.42 कोटींची संपत्ती जप्त केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT