Santosh Patil Latest Marathi News Sarkarnama
देश

BJP : संतोष पाटील आत्महत्या प्रकरणी भाजपच्या माजी मंत्र्यांना पोलिसांकडून क्लिन चिट

आत्महत्येस कारणीभूत असल्याच्या आरोपानंतर ईश्वरप्पा यांनी राजीनामा दिला होता.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची तक्रार करणारे कंत्राटदार संतोष पाटील (Santosh Patil) यांच्या आत्महत्याप्रकरणातील मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणात नाव आल्याने ग्रामविकास व पंचायत राज मंत्रिपदाचा राजीनामा दिलेले भाजपचे नेते के. एस. ईश्वरप्पा (K. S. Eshwarappa) यांना पोलिसांनी क्लिन चिट दिली आहे.

उडवी शहर पोलिसांनी याबाबतचा अहवाल बेंगलुरूतील न्यायालयात सादर केला आहे. पोलिसांना ईश्वरप्पा यांच्याविरोधात कोणताही पुरावा आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करता येणार नाही. याबाबत बी-रिपोर्ट पोलिसांनी तयार केला आहे.

पोलिसांनी अहवालासोबत सीसीटीव्ही फुटेज, ऑडिओ रेकॉर्डिंग मोबाईल मेसेज, बँक खात्यातील व्यवहार, कंत्राटाची संपूर्ण माहिती आदी कागदपत्रे न्यायालयात सादर केली आहे. पण न्यायालयाकडून अद्याप अहवाल स्वीकारण्यात आलेला नाही. दरम्यान, या अहवालावर प्रतिक्रिया देताना ईश्वरप्पा यांनी विरोधकांवर निशाणा साधाला.

हा अहवाल म्हणजे विरोधकांना उत्तर आहे. या प्रकरणात पोलिसांनी बी-रिपोर्ट सादर केल्याने मला आनंद झाला आहे. मी काहीही चुकीचे केले नाही. मला मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आता पक्षातील नेते माझ्यावर जी जबाबदारी सोपवतील, त्यानुसार काम करणार असल्याचे ईश्वरप्पा यांनी सांगितले.

काय आहे प्रकरण?

पाटील यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं. ईश्वरप्पा यांच्या सांगण्यावरून आपल्या गावातील रस्त्याच्या कामासाठी चार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. पण त्यांनी खोटेपणा, भ्रष्टाचार, अनियमितता केली, असं पाटील यांनी म्हटलं होतं. त्यामुळे ईश्वरप्पा यांना आपले बील देण्याचे सुचना द्याव्यात, अशी विनंती पाटील यांनी मोदींना केली होती. केलेल्या कामाचे चार कोटी रुपयांचे बील काढण्यासाठी ईश्वरप्पा यांच्याकडून 40 टक्के कमिशन मागितले जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता.

पाटील हे कंत्राटदार होते. तसेच हिंदू युवा वाहिनीचे राष्ट्रीय सचिव आणि भाजपचे कार्यकर्तेही होते. उडपी येथील एका हॉटेलमध्ये त्यांचा मृतदेह आढळून आला होता. दरम्यानच्या काळात पाटील यांनी त्यांच्या मित्रांना मेसेज केला होता. ईश्वरप्पा हे आपल्या मृत्यूला कारणीभूत असतील, त्यांना शिक्षा झाली पाहिजे, असं पाटील यांनी म्हटलं होतं. सुसाईट नोटही पोलिसांना सापडली होती. तसेच नातेवाईकांनाही तक्रार केल्याने पोलिसांनी ईश्वरप्पा यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT